शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘ते राज्य सरकारलाच विचारा’; औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतर स्थगितीच्या निर्णयावर पवारांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 15:10 IST

शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त आज नागपुरात आहेत. नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नागपूर : संसदेच्या दोन्ही सभागृहात शब्दांच्या वापराबाबत जारी करण्यात आलेल्या यादीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. तसंच संसदेच्या आवारात आंदोलनं, निदर्शनं करण्यावरही बंदी घातल्याची माहिती आहे. यावर राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, प्रतिक्रिया दिली. 

शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त आज नागपुरात आहेत. नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी, त्यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी असंसदीय शब्दांची यादी जारी केल्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, आम्हाला संसदेच्या अध्यक्षांकडून याबाबतीत निवेदन मिळालं आहे.  अध्यक्षांनी त्यावर अंमलबजावणी करणार नसल्याचं म्हटलं आहे, संसदेच्या आवारात निषेध करण्यास परवानगी नाही, असे कोणतेही निर्बंध नाहीत. उद्या दिल्लीत सर्व राजकीय पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करतील, त्यामुळे सत्य काय आहे ते पाहू. 

राज्यात शिंदे-फडणवासी सरकार सत्तेत आल्यानंतर आधीच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा लावलेला आहे. यातच औरंगाबाद शहराचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामांतराच्या निर्णयालाही स्थगिती दिल्याचे सांगितले जात आहे. याबाबत प्रश्न विचारला असता हा राज्य सरकारचा विषय असून ‘ते आता राज्य सरकारलाच विचारा’ असं सांगत त्यांनी यावर जास्त भाष्य करणं टाळलं.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस