शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या मुलाखतीमधील विदर्भाबाबतचा भाषिक वर्चस्वाचा मुद्दा खोडसाळपणाचा; श्रीहरी अणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 11:12 IST

वेगळ्या विदर्भाचे अग्रणी नेते श्रीहरी अणे यांनी राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या विदर्भाबाबतच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देविदर्भाची मागणी भाषावादावर आधारीत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विदर्भाबाबत हिंदी- मराठी भाषिकांच्या वर्चस्वाचा वाद हा खोडसाळ व पद्धतशीर गैरप्रसार करणारा आहे. विदर्भात हिंदी व मराठी लोकच नव्हे तर बंगाली, छत्तीसगढी, तेलंगी, गोंडी व मारवाडी भाषिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. आम्ही ह्याला आमची समृद्धी समजतो, न्यूनता नव्हे, अशा शब्दात वेगळ्या विदर्भाचे अग्रणी नेते श्रीहरी अणे यांनी राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या विदर्भाबाबतच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी पुढे, विदर्भाचे राज्य झाल्यास त्याचा मुख्यमंत्री हिंदी भाषिक असेल की मराठी भाषिक, ही भीती फक्त विदर्भाचे राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना वाटत असेल. तशी भिती त्यांची कमकुवत व स्वार्थी मानिसकता दर्शविते.विदर्भ राज्याची मागणी ही भाषावादावर आधारित नाही. आमच्या मागणीचा थेट संबंध विकासाशी आहे. १९६० ते २०१४ पर्यंत महाराष्ट्राचा एकाही ‘‘मराठी भाषिक’’ मुख्य मंत्री विदर्भाचा विकास करु शकला नाही, म्हणून आम्हाला विदर्भाचे राज्य हवे आहे.काय होते पवारांचे विदर्भाबाबतचे वक्तव्य?जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रुप आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्र मात महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी शरद पवारांची प्रकट मुलाखत घेतली होती. यावेळी बोलताना शरद पवारांनी वेगळ्या विदर्भासाठी लोकमत घ्यावे असे मत व्यक्त केले होते. याच मुद्यावर बोलताना पुढे वसंतराव नाईक यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत विदर्भातून इतके मुख्यमंत्री झाले तरी स्वतंत्र विदर्भाची मागणी कशी होते? या राज यांच्या प्रश्नावर पवार म्हणाले, वेगळा विदर्भ मागणारा मूलत: मराठी माणूस नाही, अन्य भाषिक आहे. वेगळ्या राज्याचे नेतृत्व आपल्याकडे येऊ शकते, असे मानणारे अन्य भाषिक वेगळ्या विदर्भाची मागणी करत आहेत. सामान्य माणूस मनापासून त्याचा पुरस्कर्ता नाही. ज्या कोणाला वेगळा विदर्भ हवा असेल त्यांनी लोकमताच्या माध्यमातून तो घ्यावा.

 

टॅग्स :Shrihri Anneश्रीहरी अणे