शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाहीर कलावंतांना कोरोनाचा फटका  : मानधनही मिळाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 22:51 IST

ग्रामीण भागात आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणारे शाहीर कलावंत कोरोनामुळे अडचणीत सापडले आहे.या कलावंतांचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहे. त्यामुळे कलावंतांनी उदरनिर्वाहासाठी शासन, प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.

ठळक मुद्देसीझन चालला ‘ड्राय’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागात आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणारे शाहीर कलावंत कोरोनामुळे अडचणीत सापडले आहे. उन्हाळ्याचे दिवस या कलावंतांसाठी सुगीचे दिवस असतात. ४ महिन्यात वर्षभराची कमाई करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कोरोनामुळे या कलावंतांचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहे. त्यामुळे कलावंतांनी उदरनिर्वाहासाठी शासन, प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.नागपूर जिल्ह्यात या कलावंतांची संख्या हजाराच्या जवळपास आहे. हे कलावंत खडी गंमत, तमाशा, भजन, कीर्तन, लावणी, डहाका या माध्यमातून ग्रामीण भागात कार्यक्रम करून समाजप्रबोधनाचे काम करतात. उन्हाळ्यात गावखेड्यांमध्ये या कलावंतांना मोठी मागणी असते. खेडेगावांमध्ये रात्ररात्रभर खडीगंमत, तमाशाचे फड रंगत असतात. यातून मिळणाऱ्या पैशातून या कलावंतांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. सध्या देशभरात कोरोनाचा कहर वाढतो आहे. लॉकडाऊनमुळे शहरच नाही तर गावेही ओसाड झाली आहेत. गावकऱ्यांनी तर गावेच्या गाव बंद केली आहेत. कुणी बाहेरून येणार नाही आणि गावचा कुणी बाहेर जाणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नागपुरातील प्रसिद्ध संस्था वैभव सांस्कृतिक कला मंडळ यांच्याकडे गावखेड्यातून कार्यक्रमाच्या नोंदणी झाल्या होत्या. त्यांचे सरावही सुरू झाले होते. पण फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दहशत चांगलीच वाढली त्यामुळे कलावंतांच्याहीअडचणी वाढल्या. वैभव सांस्कृतिक कला मंडळाचे सर्वच कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळे आता या कलावंतांना जगण्याची कसरत करावी लागत आहे.या कलावंतांना सरकारकडून मानधनाच्या रूपात काही पैसा मिळतो. परंतु गेल्या ४ महिन्यांपासून कलावंतांचे मानधनही बंद झाले आहे. शासनाने जगण्यासाठी शाहीर कलावंतांना कोरोना संपेपर्यंत मानधनापोटी काही निधी द्यावा, तसेच शासनाकडे थकीत असलेले मानधन लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी शाहीर निनाद बागडे, शाहीर नरहरी ऊर्फ नरेश वासनिक, ललकार शाहीर, राजकुमार गायकवाड, भजन गायक मंजूषा बागडे, शोभा वासनिक, शाहीर सिद्धार्थ, शाहीर राजेंद्र बावंकुदे यांनी निवेदनाच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcultureसांस्कृतिक