शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

अंध मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2016 01:01 IST

सेवानिवृत्त वैज्ञानिकाने आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच एका दारुड्या पित्याने आपल्या अंध मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार

नागपूर : सेवानिवृत्त वैज्ञानिकाने आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच एका दारुड्या पित्याने आपल्या अंध मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सक्करदरा पोलीस ठाणे अंतर्गत उघडकीस आला. पोलिसांनी ५८ वर्षीय आरोपीला अटक केली. १८ वर्षीय पीडित मुलगी अंध आहे. तिची ऐकण्याची क्षमताही कमी आहे. कुटुंबात आई-वडील आणि मोठा भाऊ आहे. एका वर्षापूर्वी नेत्रहिन शाळेतून सहावा वर्ग उत्तीर्ण झाल्यानंतर तिने शिक्षण सोडले. तीन वर्षांपूर्वी तिच्या एका भावाचा मृत्यू झाला. तेव्हापासून वडिलांना दारूचे व्यसन लागले. ते कधीकधीच वाहन चालवतात. आई शिलाईचे काम करून घर चालवते. पोळा जवळ असल्याने मागील दोन-तीन दिवसांपासून तिची आई बैलांना सजवणाऱ्या वस्तू तयार करून त्या विकत होती. गुरुवारी सकाळी ती मुलासोबत सक्करदरा चौकात सामान विकण्यासाठी गेली होती. घरी वडील आणि अंध मुलगी होती. दुपारी २.३० ते ३ वाजताच्या सुमारास दारुड्या वडिलाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे ती घाबरून गेली. जाताना आईने , गांधीसागर तलावाजवळील झुलेलाल मंदिराजवळ धान्य वितरित होत असल्याचे सांगत शेजारच्या महिलेसोबत जाण्यास सांगितले होते. घटनेच्या काही वेळानंतर ती शेजारी महिलेसोबत मंदिरात गेली. परत येताना तिने महिलेला घडलेला प्रकार सांगितला. त्या महिलेने लगेलच मुलीच्या आईला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तिच्या आईने सक्करदरा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना अटक केली. आरोपीने पत्नीद्वारा फसविले जात असल्याचे सांगितले आहे. (प्रतिनिधी)