शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात निराधार तरुणीचे लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 22:28 IST

एका निराधार तरुणीला प्रेमपाशात अडकवून लग्नाचे आमिष दाखवत एका आरोपीने तिचे सहा महिने लैंगिक शोषण केले. दरम्यान तिच्याकडून त्याने अडीच ते तीन लाख रुपये हडपले आणि आता लग्नास नकार देऊन तिला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या धोकेबाजीमुळे पीडित तरुणीने सदर पोलीस ठाण्यात आरोपी मोहित जितेंद्र देसाई (वय २८) याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली.

ठळक मुद्देलग्नाचे आमिष देऊन रक्कमही हडपली : सदरमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका निराधार तरुणीला प्रेमपाशात अडकवून लग्नाचे आमिष दाखवत एका आरोपीने तिचे सहा महिने लैंगिक शोषण केले. दरम्यान तिच्याकडून त्याने अडीच ते तीन लाख रुपये हडपले आणि आता लग्नास नकार देऊन तिला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या धोकेबाजीमुळे पीडित तरुणीने सदर पोलीस ठाण्यात आरोपी मोहित जितेंद्र देसाई (वय २८) याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली.तीन वर्षांपूर्वी मित्र-मैत्रिणींसोबत फुटाळा तलावावर ती बर्थ डे सेलिब्रेट करीत असताना आरोपी मोहित तेथे आला. त्यावेळी तरुणीसोबत त्याची ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. तरुणीकडे बऱ्यापैकी रक्कम असल्याने तो तिला वेगवेगळे कारण सांगून तिच्याकडून पैसे मागू लागला. दोन अडीच वर्षांत त्याने तिच्याकडून अडीच ते तीन लाख रुपये घेतल्याचे तरुणीने सदर पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, नोव्हेंबर २०१८ पासून तो तिच्यासोबत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला. मोहितचा मित्र अभिषेक याचे सदरमधील छावणी भागात स्काईस बिल्डींगजवळ गोदाम आहे. तेथील पडक्या जागेत ते दोघे शरीरसंबंध प्रस्थापित करायचे. अलिकडे तो टाळत असल्याचे लक्षात आल्याने ५ जूनच्या रात्री तरुणीने त्याला लग्नाबाबत विचारणा केली. आपली रक्कमही परत मागितली. आरोपीने लग्नास नकार देतानाच घेतलेले पैसेही परत करत नाही, असे म्हणून होईल ते करून घे, असे म्हटले. आरोपीने अश्लील शिवीगाळ करून तिला धमकीही दिली. त्यामुळे तरुणी शुक्रवारी सदर पोलीस ठाण्यात पोहचली. पीएसआय संध्या चव्हाण यांनी मोहितविरुद्ध बलात्कार करून धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून त्याची पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. पुढील तपास सुरू आहे.आरोपी मोहित देसाई पाचपावलीतील राणी दुर्गावती चौकाजवळ (महेंद्रनगर) राहतो. पीडित तरुणी (वय १९) पाचपावलीतच राहते. तिला आईवडील नाही. ती तिचा लहान भाऊ (वय १६) सोबत आजोबाकडे राहत होती. आजोबाची बऱ्यापैकी मालमत्ता आहे. त्यांचेही निधन झाल्याने आजोबाकडे असलेली रक्कम, मालमत्ता तरुणीच्या नावे झाली. नातेवाईक असले तरी तीच सर्व व्यवहार बघते. तिची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे ध्यानात घेऊनच आरोपी मोहितने तिच्यावर प्रेमजाळे फेकले असावे, असा संशय आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ