लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलालांना तसेच त्यांच्या रॅकेटमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या तिघींना पोलिसांनी बुधवारी रात्री पकडले. या दलालांवर इमामवाडा ठाण्यात गुन्हा दाखल करून तीन वारांगनांना पोलिसांनी मुक्त केले.शैलेष मछिंदर झामरे (वय ३३, रा. म्हाळगीनगर) आणि फिरोज खान (वय ४७, रा. श्रावणनगर) हे दोघे ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवितात, अशी माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यावरून बुधवारी पोलिसांनी आपला पंटर पाठवून आरोपी झामरे आणि खानसोबत संपर्क साधला. त्यांनी पोलिसांच्या पंटरच्या व्हॉटस्अॅपवर वेश्याव्यवसाय करणाऱ्या वेगवेगळ्या तरुणी, महिलांचे फोटो पाठविले. त्यातील तिघींचा सौदा ग्राहकाने (पंटर) केला. झामरेने ग्राहकाला उंटखाना दहीपुरा वस्तीत बोलविले. पोलीस पथकही ग्राहकाच्या मागे पोहचले आणि वारांगना ग्राहकांजवळ येताच पोलिसांनी छापा मारून तिघींना तसेच त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या झामरे व खानला जेरबंद केले.
नागपुरातील इमामवाड्यात सेक्स वर्कर सापडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 23:55 IST
ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलालांना तसेच त्यांच्या रॅकेटमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या तिघींना पोलिसांनी बुधवारी रात्री पकडले. या दलालांवर इमामवाडा ठाण्यात गुन्हा दाखल करून तीन वारांगनांना पोलिसांनी मुक्त केले.
नागपुरातील इमामवाड्यात सेक्स वर्कर सापडल्या
ठळक मुद्देकुंटणखाना उजेडात : दोन दलाल पकडले