शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वेबसाईटवरून वेशाव्यवसाय : दिल्लीची वारांगणा सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 20:14 IST

स्कोका डॉट कॉम या वेबसाईटवरून देहविक्रयाचे ‘मायाजाल’ निर्माण करणाऱ्या दिल्लीत वास्तव्य असलेल्या छत्तीसगडमधील महिलेला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली.

ठळक मुद्देनागपुरातील सदर पोलीस ठाण्यात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्कोका डॉट कॉम या वेबसाईटवरून देहविक्रयाचे ‘मायाजाल’ निर्माण करणाऱ्या दिल्लीत वास्तव्य असलेल्या छत्तीसगडमधील महिलेला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. माया ऊर्फ पूजा गोपाल राव (वय ३२) असे तिचे नाव आहे. ती भिलाई(छत्तीसगड)मधील मूळ रहिवासी असून, सध्या ती बजाजनगरात राहते.स्कोका डॉट कॉम या वेबसाईटवरून माया ग्राहकांना वेश्या पुरविते. त्यात तिचा मोबाईल नंबरही आहे. त्याची माहिती काढून पोलिसांनी मायाला अडकविण्यासाठी जाळे टाकले. तिच्याशी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पोलिसांनी शुक्रवारी संपर्क साधला. तिने आतिश खडसे नामक दलालाशी संपर्क करण्यास सांगितले. आतिशने वारांगना उपलब्ध करून देण्याचे सांगून सदरमधील पूनम चेंबर्सजवळ ग्राहकाला बोलविले. त्यावरून शुक्रवारी सायंकाळी ग्राहक आणि त्याच्या आजूबाजूला पोलीस पोहचले. पंधराशे रुपये स्वीकारून वेश्याव्यवसाय करणारी तरुणी ग्राहकाच्या हवाली करताच पोलिसांनी आतिशला ताब्यात घेतले. माया मात्र फरार झाली. शोधाशोध करून पोलिसांनी तिला शनिवारी सकाळी नीलकमल सोसायटी, बजाजनगर येथील सदनिकेतून ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीना जगताप, उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, फौजदार दामोदर राजूरकर, सुभाष खेडकर, हवालदार विजय गायकवाड, शीतलाप्रसाद मिश्रा, मुकुंद गारमोडे, प्रल्हाद डोळे, सुरेखा सांडेकर, छाया राऊत, साधना चव्हाण, अनिल दुबे, सामाजिक कार्यकर्त्या निशा मोरे, विजयाराणी रेड्डी आदींनी ही कामगिरी बजावली.विमानाने प्रवास, महागड्या हॉटेलमध्ये व्यवस्थामाया रावचे मायाजाल महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली अन् छत्तीसगडमध्ये असल्याचे पोलीस सांगतात. ती स्वत:च प्रारंभी चेन्नईत वेश्याव्यवसाय करायची. आता ती विविध प्रांतातील हायप्रोफाईल वारांगनांकडून वेश्याव्यवसाय करवून घेते. शुक्रवारी पोलिसांनी पकडलेली वारांगना दिल्लीची आहे. ती १५ नोव्हेंबरला विमानाने नागपुरात आली. हरदेवमध्ये तिची व्यवस्था होती. माया तिला पाच हजार रुपये रोज देत होती. ग्राहकाकडून ती एका नाईटचे २० ते ३० हजार रुपये घ्यायची तर, दिवसा एका वेळेला १५०० रुपये घ्यायची. मायाचे ठिकठिकाणी एजंटही आहेत. नागपुरात ती दीड वर्षांपासून हा व्यवसाय चालवते. तिने गोरेवाडा, गिट्टीखदानमधील आतिश रामेश्वर खडसे (वय ३८, रा. गोरेवाडा) याच्या माध्यमातून हा गोरखधंदा चालविला होता.

 

 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटraidधाड