शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उपराजधानीत सेक्स रॅकेट; रशियन बालेसह तिघी सापडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 11:15 IST

उपराजधानीत देहव्यापाराच्या धंद्यातील अट्टल गुन्हेगार, कुख्यात सचिन काशीनाथ सोनारकर आणि दीपेश दिलीपभाई कानाबार या दोघांकडून चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांनी पुन्हा एकदा भंडाफोड केला.

ठळक मुद्देसोनारकरचे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडएसएसबीचा कुंटणखान्यावर छापा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देहव्यापाराच्या धंद्यातील अट्टल गुन्हेगार, कुख्यात सचिन काशीनाथ सोनारकर आणि दीपेश दिलीपभाई कानाबार या दोघांकडून चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांनी पुन्हा एकदा भंडाफोड केला. या दोघांकडून चालविण्यात येणाऱ्या पॉश कुंटणखान्यावर छापा मारून सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) एका रशियन बालेसह तिघींना ताब्यात घेतले. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजरनगरात असलेल्या डीके लॉज अ‍ॅन्ड रेस्टॉरेंटमध्ये शनिवारी एसएसबीच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली.सचिन सोनारकर हा या गोरखधंद्यातील सराईत गुन्हेगार असून तो अनेक वर्षांपासून सेक्स रॅकेट चालवितो. त्याच्याकडे देश-विदेशातील शेकडो वारांगनांची यादी असून तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांना बोलवून घेतो. सोनारकरकडे आंबटशौकिन धनिक मंडळी, बुकींचीही मोठी यादी असून या ग्राहकांना तो पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या महानगरातील वारांगना उपलब्ध करून देतो. सचिनच्या वेगवेगळ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी अनेकदा छापा मारला असून, कारवाई केली आहे. त्याने आता कोतवालीत दीपेश कानाबारच्या मदतीने डीके लॉज अ‍ॅन्ड रेस्टॉरेंटमध्ये पॉश कुंटणखाना सुरू केल्याची माहिती कळल्यानंतर एसएसबीचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी सापळा रचून आपल्या सहकाऱ्यांसह शनिवारी सायंकाळी तेथे छापा मारला. पोलिसांना तेथे तीन वारांगना आढळल्या. त्यातील एक रशियन (किरगिझस्तान), दुसरी आसाम तर तिसरी रायपूर, छत्तीसगडची आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हा कुंटणखाना चालविण्यास सोनारकर आणि कानाबारला मदत करणारे अंकित किशोर वाहने (वय १९, रा. भांडे प्लॉट), राजेश हरिश्चंद्र गोखे (वय ३५, रा, बापूकुटीनगर, पाचपावली) यांनाही एसएसबीने सहआरोपी केले.सारेच अचंबित करणारे !कुख्यात सचिन सोनारकर ज्या पद्धतीने हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवितो, ती पद्धत अचंबित करणारी आहे. तो देश-विदेशातील अनेक महागड्या वारांगनांच्या, मोठमोठ्या हॉटेल, लॉज, रिसॉर्टच्या संचालकांच्याही संपर्कात आहे. तो वारांगनांना विमानाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो, बोलवतो. धनिक मंडळींच्या सांगण्यानुसार त्यांची आलिशान हॉटेलमध्ये व्यवस्था करतो. त्यांना इकडून तिकडे पोहचवण्यासाठी आलिशान कारची व्यवस्था करतो. भ्रष्ट पोलिसांनाही मागेल ती किंंमत देऊन तो त्यांचे तोंड बंद करतो. म्हणून सोनारकरसोबत अनेकजण मधूर संबंध ठेवतात. सोनारकरने ‘यापूर्वी एसएसबीत असलेल्या (सध्या नाही) एका पोलीस अधिकाऱ्याच्या नाकात नोटा आणि सीडीची बेसर’ टाकली होती. त्याचमुळे बेसर घातलेला अधिकारी सोनारकरवर कारवाई न करता त्याच्याकडून पाहिजे ते मागून घेत होता.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेट