नागपुरात सेक्स रॅकेट चालविणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:16 AM2019-08-04T01:16:38+5:302019-08-04T01:17:12+5:30

विदर्भात मोठे सेक्स रॅकेट चालविणारा आणि गेल्या दोन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात आरोपी कुमार ऊर्फ दिलीप शिवाजी गुळवे (वय ४१) याच्या शनिवारी पहाटे दौलताबाद औरंगाबाद हाय वे वर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मुसक्या बांधल्या.

A sex racket operater arrested in Nagpur | नागपुरात सेक्स रॅकेट चालविणारा जेरबंद

नागपुरात सेक्स रॅकेट चालविणारा जेरबंद

Next
ठळक मुद्देऔरंगाबादजवळ पकडले : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात मोठे सेक्स रॅकेट चालविणारा आणि गेल्या दोन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात आरोपी कुमार ऊर्फ दिलीप शिवाजी गुळवे (वय ४१) याच्या शनिवारी पहाटे दौलताबाद औरंगाबाद हाय वे वर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मुसक्या बांधल्या.
ठिकठिकाणच्या वारांगनांना बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारा गुळवे पाहिजे तेथे, पाहिजे त्याला वेश्या पुरवित होता. ७ जूनला त्याने अशाच प्रकारे कोलकाता येथील एका वारांगनेसह तिघींना धरमपेठमधील छोटा लाहोरी बार चौकात वेश्याव्यवसायासाठी पाठविले होते. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) तेथे छापा मारून तीन वारांगनांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी सेक्स रॅकेट चालविणारा गुळवे पळून गेला होता. एसएसबीचे पोलीस त्याचा ठिकठिकाणी शोध घेत होते. तो औरंगाबादला पॉवररूम चौक, उतरानगरी येथे संतोष लक्ष्मण काथार यांच्याकडे राहत असल्याची माहिती कळाल्याने गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनानुसार एसएसबीचे पथक औरंगाबादला पाठविण्यात आले. या पथकाने शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास आरोपी गुळवेला जेरबंद केले. त्याला आज नागपुरात आणण्यात आले. एसएसबीचे वरिष्ठ निरीक्षक उमेश बेसरकर,सहायक निरीक्षक अनुपमा जगताप, पोलीस उपनिरीक्षक स्मिता सोनावणे, एएसआय दामोधर राजूरकर, अजय जाधव, हवलदार विजय गायकवाड, शिपायी छाया राऊत आणि प्रल्हाद डोळे आदींनी ही कामगिरी बजावली.
गोव्यातही कनेक्शन
आरोपी गुळवे गेल्या अनेक वर्षांपासून वेश्याव्यवसाय चालवितो. त्याच्या रॅकेटमधील नागपूर-विदर्भच नव्हे तर विविध प्रांतातील वारांगना आणि त्यांचे दलाल आहेत. त्याचे कनेक्शन पश्चिम बंगाल, गोवा तसेच ठिकठिकाणच्या दलालांसोबत आहे. तो ग्राहकांच्या मागणीनुसार, महागड्यातील महागड्या वारांगना बोलवून देतो.

Web Title: A sex racket operater arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.