शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेती भरलेल्या ट्रकने दिली अनेकांना धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 01:05 IST

रेतीने भरलेल्या एका ट्रकच्या चालकाने मानेवाडा रिंगरोडवर शुक्रवारी सकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास प्रचंड दहशत पसरवली. एका पाठोपाठ अनेक वाहनांना आरोपी ट्रकचालकाने धडक मारली.

ठळक मुद्देमानेवाडा परिसरात भल्या सकाळी दहशत : आरोपी ट्रकचालक गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेतीने भरलेल्या एका ट्रकच्या चालकाने मानेवाडा रिंगरोडवर शुक्रवारी सकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास प्रचंड दहशत पसरवली. एका पाठोपाठ अनेक वाहनांना आरोपी ट्रकचालकाने धडक मारली. सुदैवाने जीव वाचवून अनेकांनी सुरक्षित ठिकाणी पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला.आरोपी ट्रकचालक अतुल भास्कर भिवनकर याने त्याच्या ताब्यातील रेतीने भरलेला ट्रक (एमएच ४०/ बीजी ४५५२) मानेवाडा रिंगरोडवर सुसाट वेगाने चालवून आधी स्टार बस क्र. एमएच ४० / बीजी ११६३) ला जोरदार धडक मारली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभी असलेली महिंद्रा एक्सयूव्ही (एमएच ४९/ एएस ३९१९), बजाज डिस्कव्हर, अ‍ॅक्टीव्हा, होंडा व्टिस्टर आणि होंडा सीडी १०० ला धडक मारली. या अपघात मालिकेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.फिर्यादी चंद्रशेखर सुरेश आटे (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ट्रकचालक अतुल भास्कर भिवनकर (वय २४, रा. खलासना, कळमना) याला अटक केली. रेतीची तस्करी करणारे, ओव्हरलोड वाहने चालविणारे रेती तस्कर रात्रभर रिंग रोडने जड वाहने बेदरकारपणे चालवितात. महसूल, आरटीओ किंवा पोलीस मागे लागल्यास ते वाट मिळेल तिकडे वाहने दामटतात. आज सकाळी संबंधित अधिकाऱ्याच्या धाकामुळेच रेतीने भरलेला ट्रक आरोपीने बेदरकारपणे पळविल्यामुळे हा अपघात घडल्याची चर्चा होती.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर