शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सातवा वेतन आयोग हवाय, वर्गणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:12 IST

मंत्रालयात कुठलेच काम फुकट होत नाही, त्यामुळे सातव्या वेतन आयोगाचा लाभ हवा असेल तर, प्रत्येक कर्मचाºयाने वर्गणी जमा करावी, .....

ठळक मुद्देकर्मचाºयांकडून वसुली : संघटना अध्यक्षाच्या नावाने व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंत्रालयात कुठलेच काम फुकट होत नाही, त्यामुळे सातव्या वेतन आयोगाचा लाभ हवा असेल तर, प्रत्येक कर्मचाºयाने वर्गणी जमा करावी, असा संदेश जि.प. कर्मचाºयांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत आहे. जि. प. आरोग्य कर्मचारी संघटनेच्या नावाने असलेल्या या मॅसेजमुळे ही अवैध वसुली कशासाठी? असा सूर कर्मचाºयांमधून निघत आहे.सातव्या वेतन आयोगात एमपीडब्ल्यू व एचए वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी के. पी. बक्षी समिती स्थापन करण्यात आली. या समितीसोबत २३ आॅगस्ट २०१७ रोजी संघटनेच्या पदाधिकाºयांची मुंबई येथे बैठक सुद्धा झाली. या बैठकीत वेतन त्रुटीचा प्रस्ताव संघटनेने समितीकडे सादर केला आहे. परंतु जि. प. आरोग्य कर्मचारी संघटनेच्या नावावर व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असलेल्या संदेशात संघटनेचे अध्यक्ष मधुकर सोनुने यांचे नाव आहे. मंत्रालयात कोणतेही काम फुकट होत नाही. त्यामुळे काम ताबडतोब होण्यासाठी सर्व जिल्ह्यातील कर्मचारी व पदाधिकाºयांनी ५०० ते १००० रुपये वर्गणी जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व जिल्ह्यांनी युद्धपातळीवर वेळेच्या आत वर्गणी जमा करून काम करून घेण्याची गरज आहे. अन्यथा पाचव्या, सहाव्या वेतन आयोगापासून जे लाखो रुपयांचे नुकसान झाले ते सातव्या वेतन आयोगातही एमपीडब्ल्यू, एच.ए. वर्गाचे होईल, असे सोनुने यांनी आपल्या मॅसेजमध्ये नमूद केले आहे. नियमबाह्य पैशाची मागणी करणारा व्हॉट्स अ‍ॅप वरील हा संदेश सध्या जि. प. मधील अनेक कर्मचारी व अधिकाºयांच्या मोबाईलमध्ये फिरत आहे. अशा रीतीने पैशाची मागणी करणे चुकीचेच असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष मधुकर सोनुने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुंबईला ये-जा करण्यासाठी पैसा वर्गणीच्या स्वरूपात आम्ही गोळा करतो. रीतसर वार्षिक वर्गणीही घेतो. परंतु, सध्या फिरत असलेला संदेश मी टाकला नसून, संघटनेच्या नावावर कुणीतरी खोडसाळपणा केला आहे.