आॅनलाईन लोकमतनागपूर : सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला सात वर्षे कारावास व अन्य शिक्षा सुनावली आहे. ही संतापजनक घटना २०१५ मध्ये गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीत घडली होती.अश्विन ऊर्फ बंटी नरेंद्र चव्हाण (२२) असे आरोपीचे नाव आहे. त्याला भादंविच्या कलम ३७६(१) व पोक्सो कायद्याच्या कलम ४ अंतर्गत सात वर्षे कारावास व १५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दीड महिन्यांचा अतिरिक्त कारावास तर, भादंविच्या कलम ३६३ अंतर्गत पाच वर्षे कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी हा निर्णय दिला आहे.घटनेच्या वेळी पीडित मुलगी १२ वर्षे वयाची होती. मुलगी व आरोपी एकाच वस्तीत राहात होते. ७ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास मुलगी घरापुढे सायकल चालवित होती. दरम्यान, आरोपीने तिला बळजबरीने घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. कन्नाके यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला सात वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 21:40 IST
सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला सात वर्षे कारावास व अन्य शिक्षा सुनावली आहे. ही संतापजनक घटना २०१५ मध्ये गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीत घडली होती.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला सात वर्षांचा कारावास
ठळक मुद्देसत्र न्यायालय : गिट्टीखदानमधील संतापजनक घटना