शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सात वर्षीय मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 21:26 IST

पुतणीसोबत खेळायला येणाऱ्या एका सात वर्षीय मुलीवर शेजारच्या एका नराधमाने दोन आठवड्यात अनेकदा अत्याचार केला. तिने गप्प राहावे म्हणून तिच्या आईवडिलांना ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिली. मात्र, त्याच्या अत्याचारामुळे मुलीला असह्य वेदना झाल्याने शुक्रवारी त्याचे पाप चव्हाट्यावर आले आणि मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी या नराधमाच्या मुसक्या बांधल्या. रविकांत देवराव हाडके (वय ३०) असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देवारंवार अत्याचार, आईवडिलांना मारण्याची धमकी : एमआयडीसीत गुन्हा, नराधम गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुतणीसोबत खेळायला येणाऱ्या एका सात वर्षीय मुलीवर शेजारच्या एका नराधमाने दोन आठवड्यात अनेकदा अत्याचार केला. तिने गप्प राहावे म्हणून तिच्या आईवडिलांना ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिली. मात्र, त्याच्या अत्याचारामुळे मुलीला असह्य वेदना झाल्याने शुक्रवारी त्याचे पाप चव्हाट्यावर आले आणि मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी या नराधमाच्या मुसक्या बांधल्या. रविकांत देवराव हाडके (वय ३०) असे त्याचे नाव आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आरोपी हाडके कॉम्प्युटर ऑपरेटर असून, तो देवनगर, खामल्यातील एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. त्याच्या शेजारीच पीडित मुलीचा परिवार राहतो. हाडकेला पीडित मुलीच्या वयाची पुतणी आहे. त्यामुळे पीडित मुलगी त्याच्या पुतणीसोबत नेहमी खेळायला यायची. २० मेच्या दिवशी पीडित मुलगी अशाच प्रकारे तिच्या मैत्रिणीकडे खेळायला आली असताना नराधम हाडकेने तिला वस्ती जवळच्या गार्डनमध्ये नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास तुझ्या आईवडिलांना ठार मारेन, अशी या नराधमाने धमकी दिली. त्यामुळे दहशतीत आलेल्या मुलीने गप्प राहणे पसंत केले. आपल्या पापाची वाच्यता होत नसल्याचे पाहून नराधम हाडकेने नंतर पीडित मुलीसोबत दुसऱ्यांदा कुकृत्य केले. ३ जूनला त्याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे मुलीला वेदना होऊ लागल्या. तिने शुक्रवारी आईला हा प्रकार सांगितला. आईने तिची पाहणी केली आणि मुलीला विचारणा केली असता नराधम हाडके तिचे शोषण करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार भारत क्षीरसागर यांनी बलात्कार करून धमकी देण्याच्या आरोपाखाली हाडकेविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली आहे.पाच दिवसांची कोठडीनराधम हाडके विवाहित असून, त्याला दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती आहे. पीडित मुलगी त्याला काका म्हणायची. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने प्रारंभी गुन्हा केल्याचा इन्कार केला. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्याची पाच दिवसांची कोठडी मिळवली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारArrestअटक