शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सात हजार पथदिवे तूर्त लागणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 22:19 IST

महापालिकेच्या विद्युत विभागाने शहराच्या विविध भागात सुमारे सात हजार खांब उभारले आहेत. परंतु सहा महिन्यापासून फाईल वित्त विभागाकडे प्रलंबित आहे. आता नवीन कोटेशन मागविण्याचा सल्ला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला असल्याने, तूर्त या खांबावर एलईडी दिवे लागण्याची शक्यता नसल्याने या परिसरातील नागरिकांना पावसाळा अंधारातच काढावा लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या विद्युत विभागाने शहराच्या विविध भागात सुमारे सात हजार खांब उभारले आहेत. परंतु सहा महिन्यापासून फाईल वित्त विभागाकडे प्रलंबित आहे. आता नवीन कोटेशन मागविण्याचा सल्ला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला असल्याने, तूर्त या खांबावर एलईडी दिवे लागण्याची शक्यता नसल्याने या परिसरातील नागरिकांना पावसाळा अंधारातच काढावा लागणार आहे.या खांबावर एलईडी दिवे बसविण्यासाठी १२ कोटींच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनीही या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. परंतु बांगर यांची बदली होताच वित्त विभागाने ही फाईल प्रलंबित ठेवली. निधी उपलब्ध न केल्याने पथदिवे बसविण्याचे काम रखडले आहे.नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता फाईल का थांबविली, याबाबत वित्त विभागाला वारंवार विचारणा करण्यात आली. परंतु निधी उपलब्ध केला नाही. वित्त विभागाने विद्युत विभागालाही याबाबत स्पष्ट माहिती दिली नव्हती. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवीन कोटेशन मागण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी पथदिव्याच्या फाईलला मंजुरी दिली होती. तत्कालीन आयुक्तांनी सहमती दर्शविल्याने ही फाईल मंजूर करून स्थायी समितीने वित्त विभागाकडे पाठविली होती. परंतु फाईल प्रलंबित ठेवण्यात आली. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पद्धतीने बसविण्याच्या कामाला तात्काळ निधी उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले, परंतु त्यानंतर विभागाने निधी उपलब्ध केला नाही.स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या नागपूर शहरातील पथदिवे स्मार्ट असावेत, या हेतूने नवीन एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या एलईडी दिव्यामुळे महापालिकेच्या वीज बिलात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. याचा विचार करता प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आला. परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

निर्देशानंतरही कारवाई नाहीमहापालिका कलम ७२(सी)अंतर्गत निर्धारित कालावधीत फाईलवर निर्णय न घेतल्याप्रकरणी स्थायी समितीने तत्कालीन वित्त अधिकारी मोना ठाकूर यांना नोटीस बजावून यासंदर्भात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु प्रशासनाकडून निर्देशाची अंमलबजावणी झालेली नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका