शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सात जणांना अटक

By admin | Updated: July 19, 2015 03:11 IST

आमदारास मारहाण प्रकरण : माथनी टोल नाक्यावरील घटना

तारसा : साकोलीचे आमदार बाळा ऊर्फ राजेश काशीवार (४२) यांना नागपूर-भंडारा महामार्गावरील माथनी परिसरातील टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ३.५५ वाजताच्या सुमारास मारहाण केली. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. याप्रकरणी मौदा पोलिसांनी गुन्हे नोंदवून सात जणांना शुक्रवारी रात्री अटक केली. निखील रामेश्वर गायधने (२२, रेवराळ, ता. मौदा), आशिष किशोर खरगडे (२६, रा. मौदा), शुभम पंजाबराव म्हस्के (२०, रा. मारोडी, ता. मौदा), आशिष ईश्वर सहारे (३६, रा. नागपूर), अमर विनायक तईकर (२२, रा. मौदा), पुरुषोत्तम रतिराम निंबार्ते (३०, रा. मानेगाव) व दिगांबर दामोदर मेश्राम (२१, रा. पिंडकेपार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आ. काशीवार हे कारने नागपूरहून भंडारामार्गे साकोलीला जात होते. दरम्यान, माथनी शिवारातील टोल नाक्यावर कारचालकाने कार वेगळ्या लेनमधून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे टोल नाक्यावरील कर्मचारी निखील गायधने याने कार थांबविण्याची सूचना केली. आपण आमदार असल्याचे सांगितल्यावरही निखीलने त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. यावरून वाद उद्भवला. हा वाद विकोपास गेल्याने टोल नाक्यावरील काही तरुणांनी त्यांना मारहाण केली. यात त्यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला. दरम्यान, आ. काशीवार यांनी लगेच मौदा पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून मौदा पोलिसांनी भादंवि १४३, १४७, १४९, ३२३, ३२५ अन्वये गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. या प्रकरणातील सातही आरोपींना शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आल्याची माहिती मौद्याचे ठाणेदार तागडे यांनी दिली. (वार्ताहर)