शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधिर तरुणीवर पाच महिने अत्याचार; गर्भधारणा झाल्याने घेतलं जाळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 14:13 IST

मूकबधिर तरुणीवर अनेक महिन्यापासून अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्दे मूकबधिर तरुणीवर अनेक महिन्यापासून अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. एका नराधमाने तरूणीवर अनेक महिन्यापासून अत्याचार केल्याने त्या महिलेला गर्भधारणा झाली.

 नागपूर- मूकबधिर तरुणीवर अनेक महिन्यापासून अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. एका नराधमाने तरूणीवर अनेक महिन्यापासून अत्याचार केल्याने त्या महिलेला गर्भधारणा झाली. हा प्रकार उघड झाल्यानंतर तरुणीने ऐन दस-याच्या दिवशी स्वत:ला पेटवून घेतलं. ती तरूणी सध्या मृत्युशी झूंज देत आहे. प्रचंड संताप निर्माण करणारी ही घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 

पीडित तरुणी ३४ वर्षांची आहे. वडील नसल्याने आई आणि भाऊ मोलमजुरी करून कसे बसे घर चालवितात. त्यासाठी ते दिवसभर घराबाहेर असतात. जन्मापासूनच मूकबधिर असलेली ही तरुणी घरीच राहते. तिच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन एका नराधमाने तिच्यावर सहा महिन्यांपासून अत्याचार करणं सुरू केला होता. रोजच्या दोन वेळेच्या भाजीभाकरीची सोय करण्यासाठी सकाळपासून उशिरारात्रीपर्यंत बाहेर राहणा-या तिच्या वृद्ध आईला तिच्यावरील अत्याचाराची कल्पनाही नव्हती. दस-याच्या दिवशी आईने तिची आंघोळ घालण्यासाठी तिला जवळ बोलविले. तिचे पोट एकदम वर आल्याचे दिसल्याने आई हादरली. तिने सांकेतिला शब्दात मुलीला विचारणा केल्यावर पीडित तरूणीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर घाबरलेल्या तरूणीने स्वतःला जाळून घेतलं. 

गंभीर अवस्थेत तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या प्रकारानंतर तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली.  या घटनेने माहिती परिसरात झाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले. प्रकरण पोलिसांकडे पोहचले. तिची अवस्था गंभीर असल्यामुळे आणि तिला कसलीही माहिती देत येत नसल्यामुळे तिच्या आईचे जबाब नोंदविला आहे. त्यानंतर पोलिसांनी पाच दिवसांपासून हे प्रकरण दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला पण पत्रकारांना या प्रकरणाची कुणकुण लागल्यामुळे गुरुवारी रात्री याबाबत विचारणा सुरू झाली.  त्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.