शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दसह सात सिंचन प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:53 IST

नागपूर व अमरावती विभागातील मुख्यमंत्री यांच्या वाररूममध्ये प्राधान्यक्रम असलेल्या गोसेखुर्दसह निम्न वर्धा, बेंबळा, खडकपूर्ण, निम्न पेढी, डोंगरगाव, बावनथडी या सात प्रकल्पांची कामे .....

ठळक मुद्देअविनाश सुर्वे : मुख्यमंंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारली आहे ‘वॉर रूम’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर व अमरावती विभागातील मुख्यमंत्री यांच्या वाररूममध्ये प्राधान्यक्रम असलेल्या गोसेखुर्दसह निम्न वर्धा, बेंबळा, खडकपूर्ण, निम्न पेढी, डोंगरगाव, बावनथडी या सात प्रकल्पांची कामे येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले असून त्यानुसार प्रकल्पनिहाय निधीचे नियोजनसुध्दा करण्यात आले असल्याची माहिती विदर्भ सिंचन महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी दिली.सिंचन भवन सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित माध्यम संवाद या कार्यक्रमात अविनाश सुर्वे बोलत होते. यावेळी गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता अरुण कांबळे, अधीक्षक अभियंता जी.एम. शेख, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.सुर्वे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले असून त्यासाठी वाररूम तयार करून प्रत्येक प्रकल्पांचा आढावा घेऊन प्रकल्पाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे ठरविले आहे. विदर्भातील १९ प्रकल्प या वाररूम मध्ये घेण्यात आले आहेत. त्यामध्ये बावनथडी मोठा प्रकल्प, डोंगरगाव मध्यम प्रकल्प डिसेंबर २०१७ अखेर पूर्ण करण्यात येणार आहे.दर्जेदार पुनर्वसनासाठी २५० कोटी रुपयेगोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये दर्जेदार पुनर्वसन तसेच नागरी सुविधा, पिण्याच्या पाण्याचा बारमाही पुरवठा, रस्त्यांच्या सुविधा, सांडपाणी व्यवस्था, तसेच शाळांच्या दुरुस्तीसह आदर्श पुनर्वसनासाठी २५० कोटी रुपये मिळाले आहे. आॅगस्ट २०१८ पर्यंत पुनर्वसनाचे काम पूर्ण झाल्यानंतर गोसेखुर्द प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होईल. यामुळे नागपूर, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.केंद्र सरकारच्या एनबीसीसीकडे कामशासनाने केंद्र शासनांतर्गत असलेल्या नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी) या संस्थेला गुणवत्ता व अंतर्गत नियोजनानुसार चांगले व दर्जेदार पुनर्वसन करण्यासोबत नागरी सुविधांच्या निर्मितीसाठी नियुक्त केले असून सुमारे एक हजार कोटी रुपयाचे काम ही संस्था करणार आहे. यामध्ये २०० कोटी रुपयांचे काम नागरी सुविधांची असून ८०० कोटी रुपयांचे सिंचन प्रकल्पांची कामे ही संस्था करणार आहे.बंदिस्त पाईपद्वारे शेतापर्यंत पाणीकालव्याकरिता पाईपद्वारे सिंचन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेद्वारे जून २०२० पर्यंत १५६,००० हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ पोहोचविण्याचे नियोजन आहे. यासोबतच बंदिस्त पाईपद्वारेच बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पावरील १२ उपसा सिंचन योजनांवर अंमबजावणी करून १ लाख हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ मिळेल. निम्न वर्धा अंतर्गत आर्वी तसेच गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत ५ उपसा सिंचन योजना करण्याचे नियोजन असल्याचेही अविनाश सुर्वे यांनी सांगितले. यात पाईपद्वारे थेट शेतापर्यंत पाणी पोहोचवता येणार आहे.