सेवा फाऊंडेशनची ‘मिशन ऑक्सिजन’ माेहीम ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:09 AM2021-05-16T04:09:07+5:302021-05-16T04:09:07+5:30

फाऊंडेशनचे सदस्य ललित वंजारी यांनी सांगितले, शहरात ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता पाहता ही माेहीम सुरू करण्यात आली. तीन आठवड्यापासून त्याचा ...

Seva Foundation's 'Mission Oxygen' Campaign () | सेवा फाऊंडेशनची ‘मिशन ऑक्सिजन’ माेहीम ()

सेवा फाऊंडेशनची ‘मिशन ऑक्सिजन’ माेहीम ()

Next

फाऊंडेशनचे सदस्य ललित वंजारी यांनी सांगितले, शहरात ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता पाहता ही माेहीम सुरू करण्यात आली. तीन आठवड्यापासून त्याचा वेग वाढविण्यात आला. फाऊंडेशनच्या ३००० च्यावर सदस्यांनी स्वत: निधी उभा करून सिलिंडर खरेदी केले तर काही एजन्सीकडून अरेंज केले. शास्त्रीनगर, बाबुळबन येथे वितरण केंद्र सुरू करण्यात आले. साेशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा प्रचार करण्यात आला. त्यातून खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची क्षमता नसलेल्या व मेडिकलमध्ये बेड न मिळालेल्या गरीब व गरजू रुग्णांना पुरवठा सुरू करण्यात आला. फाऊंडेशनने ऑक्सिजनसह त्यासाेबत फ्लाेमीटर आणि औषधांची किटही गरजवंतांसाठी उपलब्ध केली. सध्या नागपूरच्या केंद्रावर ३५ सिलिंडर उपलब्ध असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक प्रभावित असलेल्या वराेरा येथे ७ सिलिंडर पुरविण्यात आल्याचे वंजारी यांनी सांगितले. राेटेशनद्वारे हे सिलिंडर वितरित करण्यात येत आहे. दरराेज पाच ते सहा गरजू रुग्ण आजही सिलिंडर नेत असून आतापर्यंत शेकडाे रुग्णांपर्यंत मदत पाेहचविल्याचे त्यांनी सांगितले. वराेरा येथेही बऱ्याच रुग्णांना मदत झाली. सेवा परमाे धर्म हा उद्देश ठेवून सुरू केलेल्या मिशन ऑक्सिजन या माेहिमेमुळे अनेकांचे प्राण वाचवू शकल्याचे समाधान वंजारी यांनी व्यक्त केले.

Web Title: Seva Foundation's 'Mission Oxygen' Campaign ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.