शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करा, हायकोर्टाला विनंती

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: February 28, 2024 19:49 IST

लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीची हायकोर्टाला विनंती

नागपूर : विदर्भातील सिंचन प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्याकरिता उच्चस्तरीय समिती स्थापन करा, अशी विनंती लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाला केली. न्यायालयाने या विनंतीची दखल घेऊन राज्य सरकारला यावर तीन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात समितीची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. गेल्या तारखेला राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून विदर्भातील सिंचन प्रकल्पांची सर्वसमावेशक माहिती दिली होती. समितीने बुधवारी त्यावर प्रत्युत्तर सादर करून राज्य सरकार विदर्भाच्या सिंचन विकासाविषयी उदासीन आहे, असा आरोप केला. तसेच, विदर्भातील सिंचन प्रकल्प वेगात पूर्ण करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले जात नाही, याकडेही लक्ष वेधून वरील विनंती केली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अविनाश काळे यांनी कामकाज पाहिले.

वनक्षेत्र बाधित १६ सिंचन प्रकल्प रद्दसरकारच्या प्रतिज्ञापत्रानुसार, विदर्भातील वनक्षेत्र बाधित १३१ पैकी १६ (टाईप टू - ५ व टाईप थ्री - ११) सिंचन प्रकल्प रद्द करण्यात आले असून वन मंजुरीअभावी १० (टाईप टू - १ व टाईप थ्री - ९) प्रकल्पांचे काम अद्याप सुरू झाले नाही. आतापर्यंत केवळ ४६ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये टाईप-१ श्रेणीतील ४५ पैकी २२, टाईप-२ श्रेणीतील ३३ पैकी ८ व टाईप-३ श्रेणीतील ५३ पैकी १६ प्रकल्पांचा समावेश आहे. ५९ प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. त्यात टाईप-१ श्रेणीतील २३, टाईप-२ श्रेणीतील १९ तर, टाईप-३ श्रेणीतील १७ प्रकल्पांचा समावेश आहे.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर