शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात शिवरायांचा पुतळा बसविणार

By admin | Updated: May 1, 2017 01:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत परिसरात शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.

हालचाली वेगात : पालकमंत्र्यांनी घेतली माहिती नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत परिसरात शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. हा प्रस्ताव जुनाच असला तरी आता यासंदर्भात हालचालींना वेग आला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील याबाबत विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. २००७ साली विधीसभेच्या बैठकीत शिवाजी महाराज शैक्षणिक परिसरात महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा यासंदर्भातील प्रस्ताव आला होता. डॉ. प्रशांत कडू यांनी हा प्रस्ताव मांडला होता. विधीसभेने या प्रस्तावाला मान्यता दिली होती व तत्कालीन ‘बीसीयूडी’ संचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीदेखील तयार करण्यात आली होती. त्यानंतर बरेच वर्ष हा प्रस्ताव थंडबस्त्यात पडला. डॉ.विलास सपकाळ हे कुलगुरू असताना २०१५ साली एक समिती तयार करण्यात आली होती. ३० डिसेंबर २०१६ रोजी तत्कालीन ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.डी.के.अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली होती व पुतळा बसविण्यासंदर्भातील मुद्यावर शिक्कामोर्तब झाले होते. याबाबत पालकमंत्र्यांनी शनिवारी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. प्रभारी कुलसचिव व विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांनी विद्यापीठातील घडामोडींची माहिती दिली. पालकमंत्र्यांनी प्रस्तावाची माहिती घेत, त्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर ठेवणार असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी) १५ लाखांचा खर्च अपेक्षित छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा नेमका किती मोठा राहील हे ठरविण्यात आलेले नाही. मात्र या पुतळ्यासाठी व सौंदर्यीकरणासाठी १५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी कुठून जमा करायचा याबाबत नंतर चर्चा करण्यात येईल. अगोदर आराखडा तयार करा, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराज बाग चौकात डॉ. पंजाबराव देशमुख यांचा पुतळा आहे. त्यालाच समांतर विद्यापीठाच्या टोकावर हा पुतळा उभारण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.