लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कस्तूरचंद पार्कवर कार्यक्रम आयोजित करणाºयांकडून सध्या एकसारखे भाडे घेतले जात नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी यासंदर्भात योग्य निर्णय घेण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांना दिला.शहराच्या मध्यभागी असलेल्या कस्तूरचंद पार्कची सततच्या नियमबाह्य कार्यक्रमांमुळे दुरवस्था झाली आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी शासनाने २००३ मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. या अधिसूचनेनुसार, केवळ कस्तूरचंद पार्कवरील बांधकामच नाही तर, संपूर्ण मैदान हेरिटेज असल्याचे व नियमानुसार मैदानावर साधा खड्डाही खोदता येत नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. भाडे निश्चित नसल्यामुळे मैदानाचा व्यावसायिक दुरुपयोग होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. मनपातर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.क्लबना मागितला लेखा अहवालराज्य शासनाने शहरातील सीपी क्लब, लेडिज क्लब, महाराज बाग क्लब, गोंडवाना क्लब, वायएमसीए क्लब, आॅफिसर्स क्लब इत्यादी क्लबना क्रीडा व मनोरंजनासाठी जमीन दिली आहे. परंतु हे सर्व क्लब जमिनीचा व्यावसायिक उपयोग करीत आहेत. प्रत्येक क्लबमध्ये लग्न, साखरपुडा, प्रदर्शने, वाढदिवस इत्यादी कार्यक्रम आयोजित होत आहेत. त्यातून शासनाला काहीच महसूल मिळत नाही. न्यायालयाने या सर्व क्लबना येत्या दोन आठवड्यांत गेल्या तीन वर्षांचा लेखा अहवाल सादर करण्यास सांगितले.
कस्तूरचंद पार्कचे भाडे ठरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:42 IST
कस्तूरचंद पार्कवर कार्यक्रम आयोजित करणाºयांकडून सध्या एकसारखे भाडे घेतले जात नाही.
कस्तूरचंद पार्कचे भाडे ठरवा
ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : सध्या एकसारखी रक्कम घेतली जात नाही