लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य नागपुरातील एम्प्रेस मिलच्या जागेलगत रेडिमेड गारमेंट झोनची उभारण्यात येणार असून शहरातील दहा हजार महिला व युवकांना शिवणकाम तसेच जरीकामाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केले. राजवाडा पॅलेस येथे गीतांजली चौक ते गांधीसागर तलाव पर्यंत डी.पी. रोडचे भूमिपूजन व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत १३ लाभार्थ्यांना मालकी हक्काच्या प्रमाणपत्राच्या वितरण समारंभाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, माजी महापौर प्रवीण दटके, आयुक्त अभिजित बांगर, माजी आमदार मोहन मते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, बंडू राऊ तआदी,अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते.नागपूर शहरात ७० हजार कोटींची विकास कामे सुरू आहेत. केंद्रीय रस्ते निधीतून मध्ये नागपुरातील रस्त्यांच्या विकासासाठी ४५० कोटी दिले आहे. मध्य नागपुरातील रस्ते विकासाठी १०० कोटींची तरतूद केली आहे. शहराच्या विकासासाठी केंद्रासोबतच राज्य सरकारनेही निधी उपलब्ध केला. मध्य नागपुरातील अरुंद रस्त्यामुळे त्रास होतो. याचा विचार करता मेयो हॉस्पिटल ते भंडारा रोड, केळीबाग रोड यासह सहा रस्त्यांची कामे होत आहेत. रस्त्यांमुळे बाधित होणाऱ्यांना योग्य मोबदला व पर्यायी व्यवस्था करण्यासाठी राज्य शासनाने योग्त ती कार्यवाही केल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.
एम्प्रेस मिलच्या जागेवर रेडिमेड गारमेंट झोन स्थापणार : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 21:21 IST
मध्य नागपुरातील एम्प्रेस मिलच्या जागेलगत रेडिमेड गारमेंट झोनची उभारण्यात येणार असून शहरातील दहा हजार महिला व युवकांना शिवणकाम तसेच जरीकामाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केले. राजवाडा पॅलेस येथे गीतांजली चौक ते गांधीसागर तलाव पर्यंत डी.पी. रोडचे भूमिपूजन व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत १३ लाभार्थ्यांना मालकी हक्काच्या प्रमाणपत्राच्या वितरण समारंभाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
एम्प्रेस मिलच्या जागेवर रेडिमेड गारमेंट झोन स्थापणार : नितीन गडकरी
ठळक मुद्दे डी.पी. रस्त्याचे भूमिपूजन; एस.आर.ए. अंतर्गत मालकी हक्कांचे वाटप