शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासाठी समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 23:14 IST

रोड व फूटपाथवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासाठी आणि यापुढे रोड व फूटपाथवर नवीन अनधिकृत धार्मिक स्थळे उभारली जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी विशेष समिती स्थापन केली. समितीमध्ये महानगरपालिका आयुक्त, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती व सह-पोलीस आयुक्त यांचा समावेश करण्यात आला.

ठळक मुद्देहायकोर्ट : समितीमध्ये तीन अधिकाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोड व फूटपाथवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासाठी आणि यापुढे रोड व फूटपाथवर नवीन अनधिकृत धार्मिक स्थळे उभारली जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी विशेष समिती स्थापन केली. समितीमध्ये महानगरपालिका आयुक्त, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती व सह-पोलीस आयुक्त यांचा समावेश करण्यात आला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणावर नियमित लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या प्रकरणावर दर तीन महिन्यांनी सुनावणी करून अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईचा आढावा घेतला जाणार आहे. यानंतरची सुनावणी जानेवारी-२०१९ मध्ये निश्चित करण्यात आली आहे. सार्वजनिक रोड व फूटपाथवर बांधण्यात आलेल्या कोणत्याही अनधिकृत धार्मिक स्थळाला न्यायालयाचे संरक्षण नाही. तसेच, २९ सप्टेंबर २००९ नंतरची सार्वजनिक भूखंडांवरील अनधिकृत धार्मिक स्थळेही पाडणे आवश्यक आहे. यासंदर्भात मनोहर खोरगडे व डॉ. गजानन झाडे यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक तर, नासुप्रतर्फे वरिष्ठ अधिवक्ता एस. के. मिश्रा यांनी कामकाज पाहिले.हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देशनागरिकांना रोड व फूटपाथवरील अनधिकृत धार्मिक स्थळांची तक्रार करता यावी याकरिता हेल्पलाईन सुरू करण्यात यावी आणि हेल्पलाईनच्या क्रमांकाला व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने मनपाला दिले. हेल्पलाईनच्या क्रमांकावर व्हॉटस्अ‍ॅप सुविधा असावी. जेणेकरून नागरिकांना अनधिकृत धार्मिक स्थळांची छायाचित्रे समितीला पाठविता येतील असे न्यायालयाने स्पष्ट केले. अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्यासाठी पोलिसांनी आवश्यक सुरक्षा पुरवावी, असेही न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयReligious Placesधार्मिक स्थळे