लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना फसवणे व त्यांना धमकी देण्याच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी बिल्डर विजय तुळशीराम डांगरेने दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला. न्या. सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला.हिरा दलाल, प्रदीप खोडे, राजीव मेंघरे व रमेश पिसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी डांगरेविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ५०४, ५०६-ब अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. डांगरेने २००६ मध्ये मौजा चिखली खुर्द येथील जमिनीवर (ख.क्र. २७/१, प.ह.क्र. ३९) स्वराज पार्क नावाच्या गृह प्रकल्पाची घोषणा केली होती. तक्रारकर्त्यांनी योजनेतील बंगले खरेदी करून डांगरेला एकूण २ कोटी ४ लाख २५ हजार रुपये दिले होते. त्यानंतर प्रकल्पातील बंगल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. तसेच, तक्रारकर्त्यांना त्यांची रक्कमही परत करण्यात आली नाही. तक्रारकर्ते रक्कम मागण्यासाठी गेले असता डांगरेने त्यांना शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली. याशिवाय डांगरेने ६ मार्च २०२० रोजी संबंधित जमीन तेथील बांधकामांसह मुकुंद देशमुख यांना विकली असा आरोप आहे. न्यायालयात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले.
सत्र न्यायालय : विजय डांगरेला जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 21:30 IST
मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना फसवणे व त्यांना धमकी देण्याच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी बिल्डर विजय तुळशीराम डांगरेने दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला.
सत्र न्यायालय : विजय डांगरेला जामीन नाकारला
ठळक मुद्देमालमत्ता खरेदी करणाऱ्यांची फसवणूक