शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओमध्ये सेवा हमी कायदा!

By admin | Updated: August 29, 2015 03:20 IST

‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या धोरणाला आळा बसण्यासाठी आरटीओमध्येही आता ‘सेवा हमी कायदा’ सुरू होणार आहे.

आॅक्टोबरपासून लागू होण्याची शक्यतानागपूर : ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या धोरणाला आळा बसण्यासाठी आरटीओमध्येही आता ‘सेवा हमी कायदा’ सुरू होणार आहे. जनतेला मिळणाऱ्या सेवा या विहीत कालावधीमध्ये मिळाव्यात या उद्देशाने हा कायदा आॅक्टोबर महिन्यापासून लागू होण्याची शक्यता आहे.सरकारी सेवा, सुविधा मिळविताना जनतेला रखडपट्टीचा अनुभव येतो. त्यातून राज्यातील जनतेची सुटका व्हावी, या हेतूने राज्य सरकारने सेवा हमीचा अध्यादेश काढला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या (आरटीओ) कारभारात सुधारणा आणि पुरेशी पारदर्शकता येण्याच्या दृष्टीनेही हा कायदा महत्त्वाचा ठरणार आहे. या कायद्यान्वये १६० सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून विहित वेळेत सेवा उपलब्ध करून न देणाऱ्या अधिकाऱ्याला ५०० रुपये ते ५ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आहे. विशेष म्हणजे, दोन आठवड्यांपूर्वी परिवहन आयुक्त सोनीया सेठी यांनी आरटीओ, शहर कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी आरटीओतही हा कायदा लागू होणार असल्याचे संकेत दिले होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या संदर्भातील महत्त्वाचे नोट्स आरटीओ कार्यालयांना उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय सर्व कार्यालयीन अधिकाऱ्यांना यात येणाऱ्या अडचणीची माहितीही मागविण्यात आली आहे. यामुळे आॅक्टोबर महिन्यापासून आरटीओमध्ये कायद्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. आरटीओ कार्यालयात विविध कामानिमित्त रोज हजाराच्यावर उमेदवार येतात. कमी मनुष्यबळामुळे व वाढत्या दलालांच्या हस्तक्षेपामुळे अनेकांची कामे वेळेवर होत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. या विधेयकामुळे प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता, पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(प्रतिनिधी)