शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्व्हर’मुळे प्रवासी झाले ‘डाऊन’ :‘इंडिगो’च्या विमान प्रवाशांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 00:33 IST

‘एअरलाईन्स’चे ‘सर्व्हर’ ठीक काम करत नसल्याने प्रवाशांना ‘बोर्डिंग पास’ व तिकीट काढण्यात अडचणी आल्या शिवाय उड्डाणेदेखील रखडली होती.

ठळक मुद्देउड्डाणेदेखील रखडली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारचा दिवस ‘इंडिगो एअरलाईन्स’च्या प्रवाशांची परीक्षा पाहणाराच ठरला. ‘एअरलाईन्स’चे ‘सर्व्हर’ ठीक काम करत नसल्याने प्रवाशांना ‘बोर्डिंग पास’ व तिकीट काढण्यात अडचणी आल्या शिवाय उड्डाणेदेखील रखडली होती. त्यामुळे ‘सर्व्हर’सोबतच प्रवासीदेखील ‘डाऊन’ झाल्याचे चित्र दिसून आले.‘सर्व्हर डाऊन’असल्यामुळे कुठले विमान नागपूरला कधी येणार आहे, हे देखील ‘ऑनलाईन’ समजत नव्हते. विमानतळाच्या आतमध्ये ‘बोर्डिंग पास’च्या ‘काऊंटर’वर प्रवाशांची गर्दी झाली होती. प्रक्रियेला विलंब होत असल्याने प्रवासी संतप्त झाले होते. ‘एअरलाईन्स’च्या प्रवाशांना नाराजीचा सामना करावा लागत होता. पुणे येथून ‘सर्व्हर’मध्ये समस्या आली होती, असे सांगण्यात आले. यामुळे अनेक विमानांना विलंब झाला. ६ ई २८४ नागपूर-पुणे विमान २.१५ ऐवजी ३ वाजून ३३ मिनिटांनी पोहोचले. ६ ई १३४ पुणे-नागपूर विमान १२.२५ ऐवजी १ वाजता आले. ६ ई ५६३ चेन्नई-नागपूर विमान दुपारी १ ऐवजी १ वाजून ५६ मिनिटांनी पोहोचले. ६ ई ५३८८ मुंबई-नागपूर विमान दुपारी १.०५ ऐवजी १.५२ ला, ६ ई ४०३ मुंबई-नागपूर विमान १ तास ४० मिनिटे विलंबाने सायंकाळी ६.४० वाजता पोहोचले. ६ ई ५२५ बंगळुरू-नागपूर विमान रात्री १०.३० ऐवजी ११ वाजता पोहोचले. ‘सर्व्हर’संदर्भात ‘एअरलाईन्स’ला संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो होऊ शकला नाही.या विमानांनादेखील झाला उशीरसोमवारी ‘एअर इंडिया’चे एआय-६४१ दिल्ली-नागपूर विमान ३६ मिनिटे विलंबासह रात्री १.५६ वाजता पोहोचले. ‘गो एअर’चे जी८-२६०१ मुंबई-नागपूर विमान १ तास १८ मिनिटे उशिराने सकाळी ९.०८ वाजता पोहोचले. तर जी८-७३१ अहमदाबाद-नागपूर विमान १.२४ मिनिटे विलंबासह दुपारी १ वाजता ‘लॅन्ड’ झाले. एआय-६२९ मुंबई-नागपूर विमान सव्वातास विलंबाने रात्री ९.५५ ला पोहोचले. जी८-२५१९ दिल्ली-नागपूर विमानाचे रात्री ८.५५ ऐवजी १०.२० ‘लॅन्डिंग’ झाले.

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर