शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नाटकातील ते वाक्य खरे ठरले! ट्रम्पना धडकी भरविण्यात सिंहाचा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 13:07 IST

Nagpur News ‘आज मी मिशिगनचा गव्हर्नर नसेल झालो, पण उद्या ट्रम्पला धडकी भरवेल, हे निश्चित. ’ हे वाक्य त्यांनी खरे करून दाखवले आहे.

 प्रवीण खापरे    लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अगदी जानेवारी २०२० पासूनच ‘श्री २०२०’ हे कॅम्पेन बॅनर अमेरिकेतील मिशिगन-डिट्रॉयटसह महाराष्ट्रात खूप गाजले. तेथील राष्ट्राध्यक्षपदासाठी ज्या ५३८ सिनेटर्सची भूमिका महत्त्वाची होती, त्या निवडणुकीत हे कॅम्पेन महत्त्वाचे ठरले आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडून ९३ टक्के मत घेत निवडूनही आले. अमेरिकेत त्यांना श्री या नावानेच ओळखले जाते, ते श्रीनिवास ठाणेदार यांचा नागपूरशी अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे. १६ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या निमित्ताने ते नागपूरला आले आणि त्यांच्या चरित्राचे नाट्य रूपांतरण झाले. या नाटकाच्या अखेरचे संवाद होते ‘आज मी मिशिगनचा गव्हर्नर नसेल झालो, पण उद्या ट्रम्पला धडकी भरवेल, हे निश्चित. ’ हे वाक्य त्यांनी खरे करून दाखवले आहे.जागतिक मराठी अकादमीच्या ४ ते ६ जानेवारी २०१९ रोजी नागपुरात पार पडलेल्या १६ व्या ‘जागतिक मराठी संमेलना’चे ते अध्यक्ष होते. याच संमेलनात त्यांच्या ‘ही श्रींची इच्छा’ या आत्मचरित्राच्या ५० व्या आवृत्तीचे आणि आत्मचरित्राचा दुसरा भाग ‘पुन्हा श्रीगणेशा’च्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन झाले होते. हे संमेलन पार पडले, पण नागपूरचे संबंध तुटले नाही. संमेलनात येथील हौशी रंगकर्मींची झालेली औटघटकेची भेट नंतर दृढ झाली आणि आपल्या चरित्राचे नाट्य रूपांतरण करण्याची जबाबदारी येथीलच कलावंतांवर सोपवली. ‘बायोपिक श्री’हे नाटक बघण्यासाठी ते खास नागपूरला आले आणि अगदी व्हरांड्यात सादर केलेल्या नाटकातील आपला प्रवास बघून त्यांचे डोळे पाणावले. रंगकर्मींचे भरभरून कौतुक करत त्यांनी ही भेट इथेच संपणार नाही. रंगमंचासाठी ही भेट निरंतर होत राहील, असे आश्वासनही दिले.

निवडणूक आणि नाटकाचा वादश्री ठाणेदार निवडणुकीत उभे राहणार म्हणून मिशिगनमधील जॅक किंग नावाच्या नाटककाराने त्यांच्या विरोधात आगडोंब भडकविण्याचा प्रयत्न केला होता. ‘बायोपिक श्री’विरोधातही अर्वाच्य भाषेत टीका केली होती. मात्र, हा ठाणेदारांविराेधात निवडणूक स्टंट असल्याचे नंतर स्पष्ट झाले. तेथील मतदारांनी जॅक किंगला भावच दिला नाही, हे विशेष. 

माझे मराठी-हिंदी चित्रपट-नाटक क्षेत्रातील कलावंतांशी जवळचे संबंध आहेत. त्यांना मी अमेरिकेत आमंत्रितही करीत असतो. मात्र, नागपुरातील रंगकर्मींमध्ये जो स्पार्क दिसला त्याने मी भारावून गेलो. हौशी रंगभूमीचा आणि अमेरिकेतील अतिशय संपन्न ब्रॉडवे, ऑफ ब्रॉडवे, ऑफ ऑफ ब्रॉडवे रंगभूमीसंदर्भात सेतू निर्माण करता येऊ शकतो, असे मला वाटते.- श्रीनिवास ठाणेदार, स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह, मिशिगन लेजिस्लेटिव्ह हाऊस

आम्ही ज्यांच्या चरित्रावर नाटक केले आणि प्रत्यक्ष त्यांच्यासमोरच सादर केले, असे श्रीनिवास ठाणेदार सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकन संसदेत निवडून गेले, याचा अभिमान वाटतो. ‘बायोपिक श्री’ हे त्यांचे चरित्र आहे आणि काही करण्यात आलेली भाकिते खरी ठरत आहेत, याचा आनंद आहे.- जयंत बन्लावार, दिग्दर्शक (संस्थापक - हेमेंदू रंगभूमी)

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प