शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक : नागपुरात सात वर्षीय बालकाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 19:59 IST

सात वर्षीय बालकाला फिरायला नेतो, असे सांगून एका ओळखीच्या व्यक्तीने त्याचे अपहरण केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री ही घटना घडल्याचे उघडकीस आले. आरोपी बिहारचा मूळ रहिवासी असल्याने त्याने अपहृत बालकाला बिहारमध्येच नेले असावे, असा संशय आहे. दरम्यान, अपहृत बालक आणि आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी धावपळ चालविली आहे.

ठळक मुद्देओळखीच्या व्यक्तीने पळवून नेलेबिहारला घेऊन गेल्याचा संशयकळमन्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सात वर्षीय बालकाला फिरायला नेतो, असे सांगून एका ओळखीच्या व्यक्तीने त्याचे अपहरण केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री ही घटना घडल्याचे उघडकीस आले. आरोपी बिहारचा मूळ रहिवासी असल्याने त्याने अपहृत बालकाला बिहारमध्येच नेले असावे, असा संशय आहे. दरम्यान, अपहृत बालक आणि आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी धावपळ चालविली आहे.कळमन्याच्या दानामंडीत काम करणारा आरोपी मिथुन पाचमान (वय २५) मूळचा दरभंगा (बिहार) जिल्ह्यातील दरहाय ग्राम येथील रहिवासी आहे. कामाच्या निमित्ताने तो नागपुरात राहत होता. लक्ष्मीनगर कळमना येथील संगीता फेकन महातो (वय ३५) यांच्या नात्यात लागत असल्यामुळे त्यांच्याकडे आरोपीचे येणे-जाणे होते. गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास नेहमीप्रमाणे तो संगीताच्या घरी आला. यावेळी संगीता यांचा मुलगा धीरज (वय ७ वर्षे) बाजूला खेळत होता. त्याला फिरवून आणतो, असे म्हणत आरोपी मिथुनने धीरजला सोबत नेले. दोन, तीन तास होऊनही आरोपी मिथुन मुलाला घेऊन परतला नाही. त्यामुळे घाबरलेल्या महातो कुटुंबीयांनी त्याचा शोध घेणे सुरू केले. इकडे तिकडे शोध घेतल्यानंतर तो आढळला नाही. आजूबाजूच्यांना विचारपूस केली असता आरोपी धीरजला घेऊन रेल्वेस्थानकाकडे गेल्याचे समजले. त्यामुळे संगीता यांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.चौकशीत आरोपी आणि पीडित परिवार एकाच गावचे रहिवासी असल्याचे पुढे आले. नेहमी जाणे-येणे असल्यामुळे आणि चॉकलेट वगैरे घेऊन देत असल्यामुळे धीरज आरोपीच्या सोबत सहजपणे वावरत होता. आरोपी दिसला की धीरज त्याला दुकानात चलण्याचा आग्रह धरायचा. गुरुवारीदेखिल असाच प्रकार झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी आरोपीची शोधाशोध चालवली आहे.आरोपीसोबत संपर्क नाहीआरोपीकडे मोबाईल नसल्याने मिथुनसोबत पोलिसांचा संपर्क झालेला नाही. त्यामुळे तो धीरजसोबत नेमका कुठे आहे, ते स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आरोपीच्या मूळगावी राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांसोबत पोलिसांचा संपर्क झाला असून, तो शनिवारी दुपारपर्यंत तेथे पोहचला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अपहृत धीरजच्या पालकांसोबतच पोलिसांचीही अस्वस्थता वाढली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण