शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील दोघांच्या मृत्यूने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 22:53 IST

प्रादेशिक मनोरुग्णालयात २४ तासांत दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, यात एक २७ वर्षीय तरुणाचा समावेश असून त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे२७ वर्षीय तरुणाचा मृत्यू संशयास्पद

ऑनलाईन लोकमत नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात २४ तासांत दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, यात एक २७ वर्षीय तरुणाचा समावेश असून त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात कोणी अधिकारी बोलायला तयार नाही. मात्र, गेल्या वर्षी गळा दाबून हत्या केलेल्या दोन मनोरुग्णाच्या घटनेला याच्याशी जोडून पाह्यले जात आहे.निरंजन नागपुरे (२७) रा. वर्धा असे एका मृताचे नाव असून, दुसऱ्या ६७ वर्षीय मृताची अनोळखी म्हणून रुग्णालयात नोंद आहे.प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन मनोरुग्णाचा गळा दाबून हत्या झाल्याची घटना ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. यात उपचार घेत असलेले ४४ वर्षीय जयंत नेरकर यांचा मृत्यू १७ सप्टेंबर २०१६ रोजी तर ६० वर्षीय मालती पाठक यांचा मृत्यू ६ आॅक्टोबर २०१६ रोजी झाला. या दोघांचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबून झाल्याचा शवविच्छेदन विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले होते. या घटनेला घेऊन हिवाळी व उन्हाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाले होते. आरोग्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या चौकशीचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. असे असताना हे दोन्ही मृत्यू आणि निरंजन नागपुरे याचा झालेला मृत्यू ही घटना सारखीच असल्याचे बोलले जात आहे. निरंजन नागपुरे हा गेल्या पाच दिवसांपासून मेडिकलमध्ये उपचार घेत होता. त्याला ‘हायपोनायट्रोमिया’(शरीरातील सोडियम कमी होणे) नावाचा आजार होता. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर गुरुवारी रात्री ८ वाजता त्याला मेडिकलमधून सुटी देण्यात आली. शुक्रवारी सकाळी ६ वाजता अटेंडंट निरंजनला उठविण्यास गेला असता तो खाटेवर मृतावस्थेत पडला होता. रुग्णालय प्रशासनाने याची माहिती मानकापूर पोलीस ठाण्याला दिली असून, निरंजनचा मृतदेहशवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू मेडिकलमध्येच झाला. ६७ वर्षीय हा रुग्ण अनोळखी असून न्यायालयाच्या निर्देशानुसार मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मूत्रपिंड निकामी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

 

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयnagpurनागपूर