शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात रेल्वे रुग्णालयाच्या स्वीच रूमला आग लागल्यामुळे खळबळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 20:40 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे रुग्णालयाच्या स्वीच रूमला रविवारी रात्री ९ वाजता आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवीत अग्निशमन यंत्राने आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु आगीचा धूर रुग्णालयात पोहोचल्यामुळे अतिदक्षता कक्षातील रुग्णांना तातडीने बाहेर काढून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

ठळक मुद्देदुर्घटना टळली : ‘आयसीयूतील रुग्णांना खासगी रुग्णालयात हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे रुग्णालयाच्या स्वीच रूमला रविवारी रात्री ९ वाजता आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवीत अग्निशमन यंत्राने आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु आगीचा धूर रुग्णालयात पोहोचल्यामुळे अतिदक्षता कक्षातील रुग्णांना तातडीने बाहेर काढून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ‘डीआरएम’ कार्यालयाच्या शेजारी रेल्वे रुग्णालय आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी रविवारी रात्री ९ वाजता या रुग्णालयाच्या लिफ्टमागील स्वीच रूममधून धूर बाहेर येताना दिसला. ड्युटीवरील रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी स्वीच रूमची तपासणी केली असता त्यांना स्वीच रूममध्ये आग लागल्याचे समजले. समयसूचकता दाखवून कर्मचाऱ्यांनी अग्निशमन विभागाला आगीची सूचना दिली. कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु तोपर्यंत आगीचा धूर अतिदक्षता कक्ष आणि रुग्णालयात पसरला. यात अतिदक्षता कक्षातील रुग्णांची प्रकृती बिघडू नये यासाठी तातडीने या कक्षातील रुग्णांना बाहेर काढण्यात आले. लागलीच त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. तर काही रुग्णांना याच रुग्णालयाच्या इतर वॉर्डात हलविण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झाली नाही. घटनेची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, एन. के. भंडारी, मुख्य वैद्यकीय अधीक्षकांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. रात्री १ वाजताच्या दरम्यान रुग्णालयातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. स्वीच रूमला आग कशामुळे लागली याचा तपास करण्याची सूचना देण्यात आली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेhospitalहॉस्पिटल