लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लॅटफार्म क्रमांक ८ शेजारील लूप लाईनवर उभ्या असलेल्या कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या एका वॅगनला सोमवारी दुपारी २ वाजता आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही आग विझवल्यामुळे अनर्थ टळला.पूर्वेकडील होम प्लॅटफॉर्म क्रमांक ८ च्या शेजारी असलेल्या लूप लाईनवर एक कोळशाने भरलेली मालगाडी उभी होती. सोमवारी दुपारी २ वाजता या मालगाडीच्या एका वॅगनमधील कोळशातून आगीच्या ठिणग्या आणि धूर निघताना दिसला. लागलीच रेल्वेस्थानकावरील कर्मचाऱ्यांनी या वॅगनवर पाणी मारून लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून रेल्वेगाड्यांचे आवागमन सुरू होते. त्वरित उपाययोजना केल्यामुळे मोठी हानी टळली. आग विझविल्यानंतर मालगाडीपासून आग लागलेली वॅगन रुळावरून काढून यार्डात पाठविण्यात आली.
नागपुरात कोळशाने भरलेल्या वॅगनला आग लागल्यामुळे खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:11 IST
प्लॅटफार्म क्रमांक ८ शेजारील लूप लाईनवर उभ्या असलेल्या कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या एका वॅगनला सोमवारी दुपारी २ वाजता आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही आग विझवल्यामुळे अनर्थ टळला.
नागपुरात कोळशाने भरलेल्या वॅगनला आग लागल्यामुळे खळबळ
ठळक मुद्देरेल्वेस्थानकावरील घटना : वेळीच आग विझविल्याने अनर्थ टळला