शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे नागपुरात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 11:02 IST

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे मंगळवारी निधन झाले.

ठळक मुद्देश्रमिक चळवळीचा आधारस्तंभ हरविला

आॅनलाईन लोकमतनागपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे मंगळवारी निधन झाले. कामगार केसरी म्हणून नावलौकिक असलेले रामभाऊ रुईकर यांच्या त्या कन्या होत. दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या इच्छेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोपरांत देहदान करण्यात आले. त्यांच्यापश्चात भाऊ, बहीण व बराच मोठा आप्तपरिवार आहे. रामभाऊ रुईकर यांनी श्रमिक, कामगारांच्या हक्कासाठीचा लढा आयुष्यभर चालविला. मालतीताई यांनीही वडिलांचा वसा आयुष्यभर प्रामाणिकपणे जोपासला. मालतीताई समाजकार्याची पदवी घेऊन मुंबईहून नागपूरला परतल्या, त्याच वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यावेळी महाराष्टची स्थापना झालेली नव्हती व हा भाग सी.पी. अ‍ॅन्ड बेरारमध्ये समाविष्ट होता. शासनाने त्यांना लेबर आॅफिसर म्हणून नियुक्ती दिली. स्वत: अविवाहित राहून त्यांनी बहीण, भावांचे शिक्षण व कौटुंबिक जबाबदारी पार पाडली. पुढे स्वतंत्र महाराष्टत कामगार उपायुक्त म्हणून त्या निवृत्त झाल्या. वडिलांकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा पुढे नेत त्यांनी श्रमिक चळवळीच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. त्यांनी हिंद मजदूर सभेची स्थापना केली. त्यावेळी कामगारांच्या हक्कासाठी लढा देणारे माकप नेते भाई बर्धन आणि वसंतराव साठे यांच्याप्रमाणेच या भागात कामगारांच्या चळवळीला चालना दिली. १९९५ ला रामभाऊ रुईकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त आर. एस. रुईकर इन्स्टिट्यूट आॅफ लेबर अ‍ॅन्ड सोशियोकल्चरल स्टडीज या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली होती. त्या या संस्थेच्या महासचिव म्हणून कार्य करीत राहिल्या. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यभर श्रमिक चळवळीचे काम चालविले. आठ महिन्यांपूर्वी एका अपघातामुळे त्या अंथरुणाला खिळल्या व यातून बाहेर निघणे शक्य होऊ शकले नाही.

श्रमिक संघटनेचा आधार हरविलाआर. एस. रुईकर संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी मालती रुईकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांच्या निधनाने श्रमिक चळवळीची प्रेरणा आणि संघटनेचा आधारस्तंभ हरविल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूर