नागपूर : सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या या उद्बोधन वर्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ मंत्र्यांची उपस्थिती होती. गुरुवारी सकाळी ७.३०नंतर आमदार व मंत्री स्मृतिमंदिर परिसरात येण्यास सुरुवात झाली. सर्व मंत्री व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांचे शिस्तबद्ध पद्धतीने चहापान झाले. यानंतर येथील महर्षी व्यास सभागृहात ‘बौद्धिक’ झाले. संघ स्मृतिमंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांचादेखील समावेश होता. यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगारमंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संघस्थानी मुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ मंत्र्यांची उपस्थिती
By admin | Updated: December 18, 2015 03:31 IST