शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Festival 2018 : नागपुरात गणरायाच्या निरोपासाठी कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:50 IST

रविवारी होणाऱ्या गणरायाच्या निरोपासाठी शहर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. अधिकाऱ्यांसह तब्बल दोन हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांसह दोन हजार पोलीस कर्मचारी तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारी होणाऱ्या गणरायाच्या निरोपासाठी शहर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. अधिकाऱ्यांसह तब्बल दोन हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.नागपुरात सुमारे १०१० सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे गणेश प्रतिमांची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक गणेश प्रतिमांचे विसर्जन २३ सप्टेंबर रोजी रात्रीला होण्याची शक्यता आहे. विसर्जनासाठी चोख पोलीस बंदोबस्त केला आहे. यात ७ डीसीपी, १० एसीपी, ४२ पोलीस निरीक्षक, १२९ एपीआय-पीएसआय आणि १७०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी विसर्जनाच्या मार्गात सुरक्षेचे जाळे पसरविले आहे. विसर्जन मार्गाला १२ सेक्टरमध्ये विभाजित करण्यात आले आहे. महत्त्वपूर्ण सेक्टरमध्ये अतिरिक्त पोलीस अधिकारी कर्मचारयांना तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी वाहतूक विभागातील पोलीस अधिकाऱ्यांसह ६०० कर्मचारीही तैनात राहतील. एसआरपीची एक कंपनीही तैनात करण्यात आली आहे. सर्वाधिक गणेश प्रतिमांचे विसर्जन फुटाळा तलावात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे फुटाळा तलावावर सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ गणेश प्रतिमा असलेल्या वाहनांनाच तलावापर्यंत जाता येईल. नागरिकांची वाहने तेलंगखेडी हनुमान मंदिर रोड आणि वायुसेना रोडवर पार्क केली जातील. त्याचप्रकारे अमरावती रोडने येणाऱ्या वाहनांना कॅ म्पस टी पॉर्इंटवर रोखले जाईल. फुटाळा तलवावर वाहतूक व्यवस्था संचालित करण्यासाठी मोबाईल सर्व्हिलन्स व्हेईकल (एमएसवी) चा वापर केला जाईल. वाहनातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने परिसरावर नजर ठेवली जाईल. वाहनातच कंट्रोल रुमसुद्धा आहे. त्याच्या स्क्रीनवर सर्व हालचाली स्पष्टपणे दिसून येतील. उच्च न्यायालयाने डीजे वाजवण्यास मंजुरी न दिल्यामुळे पोलिसांनी गणेश मंडळाना याचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनPoliceपोलिस