शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील हिंगण्यात सेनेची भाजपला साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 20:43 IST

हिंगणा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या लता गौतम (पारधी) तर उपाध्यक्षपदी अजय बुधे यांची निवड झाली आहे.

ठळक मुद्देगौतम नगराध्यक्ष तर बुधे उपाध्यक्ष

नागपूर : हिंगणा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या लता गौतम (पारधी) तर उपाध्यक्षपदी अजय बुधे यांची निवड झाली आहे.

शुक्रवारी नगर पंचायत कार्यालयात नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. तीत लता गौतम (पारधी) यांना १२ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशाखा लोणारे यांना ५ मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अजय बुधे यांनाही १२ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दादाराव इटनकर यांना ५ मते मिळाली.निवडणुकीत भाजपावर सडकून टीका करणाऱ्या शिवसेनेने नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदान केल्याने मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहराच्या विकासासाठी भाजपाला मतदान केल्याचे शिवसेनेचे नगरसेवक विष्णू कोल्हे यांनी मतदानानंतर स्पष्ट केले.१७ सदस्यीय हिंगणा नगर पंचायतीत भाजपाचे ९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, अपक्ष (२) तर शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे. दोन अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्याने भाजपाने ११ जणांच्या गटाची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आधीच केली होती. निवडणुकीत सेनेने साथ दिल्याने भाजपाच्या गटाचे संख्याबळ १२ वर पोहोचले. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे आ. समीर मेघे यांनी अभिनंदन केले.यावेळी माजी नगराध्यक्ष छाया भोस्कर, सुचिता चामाटे, विशाल चामाटे, बेबी गजबे, माया ढवळे, प्राजक्ता गजबे, जया खाडे, कल्पना वडे, शांताराम मडावी व शिवसेनेचे विष्णू कोल्हे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूक