शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण, नातेवाइकांसाठी ‘एम्स’मध्ये ‘सेल्फी पॉइंट 

By सुमेध वाघमार | Updated: January 8, 2024 19:16 IST

तुटलेल्या वॉश बेसिनमध्ये लावले शोभिवंत झाडे.

 नागपूर:  आजाराची चिंता, दुखणे, औषधांचा दर्प यात नाऊमेद होणाऱ्या मनाला एक उमेद मिळावी यासाठी  अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी एक अभिनव संकल्पना साकारली. रुग्णालयातीलच टाकाऊ वस्तूपासून ‘सेल्फी पार्इंट’ तयार केले. सध्या रुग्ण आणि नातेवाईकांसाठी हे एक आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

‘एम्स’मधील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) व आंतररुग्ण विभागात (आयपीडी) रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी, रुग्णालयातून निघणाºया कचºयाचे प्रमाणही वाढले आहे. यातील ज्या टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या, वाहनांचे निकामी टायर, प्लास्टिक कचºयाचा योग्य वापर करण्याची कल्पना डॉ. श्रीगिरीवार यांना सूचली. त्यांनी या कचºयातून सौंदर्य फुलवण्यासाठी  प्रयत्नाला सुरूवात केली. त्यांनी टाकाऊ प्लास्टिक बाटल्या पासून ते न वापरलेले परंतु खराब झालेल्या पीपीई किट, औषध, रसायनांचे डबे, तुटलेले वॉश बेसिन, टॉयलेट सीट्मध्ये शोभिवंत झाडे लावली. या सर्व झाडांसह साहित्यांना आकर्षत पद्धतीने ठेऊन त्याचा ‘एम्स’मध्ये ‘सेल्फी पॉईंट’ तयार केला. यातून नागरिकांना कचऱ्यातून कलेचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात एम्सच्या डॉ. नीलम, ज्योती लाटवाल आणि चचाणे यांचेही महत्त्वाचे योगदान लाभले.

-कचऱ्याच्या पूनर्रवापरातून फुलविले सौंदर्य

‘एम्स’मध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी, रोज निघणाºया कचºयातही वाढ झाली आहे. विशेषत: प्लास्टिकच्या कचºयाचा पूर्नवापर करण्याचा सुरूवातीपासून विचार होता. अखेर त्यात शोभीवंत झाडे लावून रुग्णालयाचा एका कोपऱ्यात सौंदर्य फु लविण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने प्रयत्न झाले आणी एक सामाजिक संदेश देणारा ‘सेल्फी पार्इंट’ निर्माण झाला. -प्रा. डॉ. मनीष श्रीगिरीवार, वैद्यकीय अधीक्षक, एम्स, नागपूर.

टॅग्स :nagpurनागपूर