शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चे न्यूड फोटो, व्हिडिओ बॉयफ्रेण्डला पाठविले अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 08:00 IST

Nagpur News सोशल मिडियावर ओळख झालेल्या मित्राला आपले न्यूज फोटो व व्हिडिओ पाठवण्याचे जे फॅड आले आहे त्या विकृत मानसिकतेबाबत पोलीस संभ्रमात आहेत.

ठळक मुद्देबलात्कार, ब्लॅकमेलिंगच्या काही घटनांमधील धक्कादायक वास्तव याला काय म्हणायचे, प्रेम, आकर्षण की विकृती ?

नरेश डोंगरे ।

नागपूर - इन्स्टा, फेसबुकवर ओळख होते अन् तो खरेच त्या गावचा रहिवासी आहे की नाही, त्याने स्वत:बाबत फेकलेल्या (सांगितलेल्या) गोष्टी खऱ्या आहे की नाही, ते न तपासाच त्याला काही जणी बॉयफ्रेण्ड बनवून घेतात. इथवर ठीक समजले तरी पुढे त्याला स्वत:चे चक्क न्यूड फोटो पाठविणाऱ्या युवतींना काय म्हणावे, असा प्रश्न पडतो. प्रचंड धक्कादायक तसेच विकृत मानसिकतेचा परिचय देणारे हे फॅड आले की काय अशी शंका यावी, अशी काही प्रकरणे गेल्या दोन ते तीन महिन्यांत उजेडात आली आहेत. महिला मुलींची बदनामी होऊ नये म्हणून पोलीस अन् पत्रकार या संबंधाने उघडपणे काही बोलत, लिहित नाहीत. मात्र, उघड झालेल्या या घटनांना आकर्षण म्हणावे, प्रेम म्हणावे की विकृती, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

आमची फेसबुकवर ओळख झाली अन् आम्ही सलग चॅटिंग करू लागलो. प्रेमसंबंध जुळल्याने विश्वासही वाढला. त्याचमुळे त्याने मागितल्याप्रमाणे त्याला स्वत:चा न्यूड व्हिडिओ, फोटो स्वत:च्या मोबाईलवरून पाठविले. त्याने आता ते सर्व नातेवाईकांना पाठविले आहे, अशी तक्रार एका तरुणीने गेल्या आठवड्यात पोलिसांकडे नोंदवली. ही एकच तक्रार नाही. गेल्या दोन ते तीन महिन्यांत स्वत:चे न्यूड फोटो, व्हिडिओ पाठविणाऱ्या अर्धा डझन तक्रारी शहरातील विविध पोलीस ठाण्यात पोहचल्या आहेत. पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करतात अन् आरोपीवर कारवाईही करतात. मात्र, स्वत:चे अश्लील फोटो, व्हिडिओ पाठविण्याचा निर्ढावलेपणा दाखविणाऱ्या महिला-मुलींना कसे समजवायचे, असा प्रश्न उपस्थित होतो. खालील काही घटना प्रातिनिधिक स्वरुपाच्या असल्या, तरी समाजमनाला अंतर्मुख करायला भाग पाडणाऱ्या ठराव्यात.

१)

ती नववी, तर तो दहावीचा विद्यार्थी. दोघेही समृद्ध कुटुंबातील. नामांकित शाळेत शिकणारे. त्यांच्यातील अल्पवयीन मैत्री अशी काही फुलते की साऱ्या मर्यादा ती तार तार करते. दोघेही धिटावलेले. फेसबुक, व्हॉटस्ॲप, इन्स्टावर सलग संपर्कात राहतात. तो म्हणतो की, त्याप्रमाणे ही त्याला स्वत:चा अंघोळ करतानाचा व्हिडिओ तसेच अन्य विवस्त्र फोटो पाठवते. तिचा हा बॉयफ्रेण्ड त्याच्या शाळकरी मित्र-मैत्रिणीत इम्प्रेशन जमविण्यासाठी त्यांना ते सर्व अश्लील फोटो, व्हिडिओ दाखवतो अन् ते उघड झाल्यानंतर तिलाच नव्हे तर तिच्या कुटुंबीयांनाही जबर मानसिक धक्का बसतो.

२)

तिचे अन् त्याचेही लग्न झालेले. लग्नापूर्वीचे त्यांच्यातील प्रेम १५ वर्षांनी अचानक उफाळून येते. आपला परिवार आहे, मुलंबाळ आहे, सारे सारे विसरून ते ‘मुक्त विहार’ करण्यात मश्गूल होतात. एकमेकांवर हक्क दाखवतानाच दुसऱ्याने बेईमानी केल्यास पुरावा म्हणून दोघांचे न्यूड फोटो मोबाईलमध्ये बाळगतात. फक्त मलाच वेळ हवा, कुठे जाते, काय करते, त्याचा प्रत्येक क्षणाचा हिशेब पाहिजे म्हणून अट्टहास धरतात अन् नंतर त्यांच्यात फाटते. अर्थातच, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची पोलिसांकडे तक्रार होते.

३)

फेसबुकवर मैत्री झाली. एकमेकांचे आकर्षक फोटो, प्रोफाईल पाहून दोघे सलग ऑनलाईन संपर्कात राहू लागले. नंतर तो तिच्या अन् ती त्याच्या गावात पोहोचली. तेथे दोघांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्या अवस्थेत फोटो काढले अन् व्हिडिओही बनविले. ते दोघांच्या मोबाईलमध्ये साठवून ‘त्या मधुर क्षणांची’ ते नंतर काल्पनिक अनुभूती घेऊ लागले अन् नंतर तिला तो बदमाश असल्याचा साक्षात्कार झाला. ती त्याला टाळू लागताच त्याने तिच्यासोबतचे ते व्हिडिओ, फोटो चक्क तिच्या नातेवाईकालाच पाठवले.

 

---

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया