शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताकदिनी  जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन

By गणेश हुड | Updated: January 19, 2024 18:20 IST

७ व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी देताना प्रामुख्याने लिपीक वर्गीय संवर्गासह व इतर संवर्गाच्या कर्मचाऱ्यांवर बक्षी समितीने अन्याय केला आहे.

नागपूर :  राज्यभरातील जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत लिपीकवर्गीय व अन्य संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावती दूर कराव्यात. तसेच शासनाकडे  प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी मुंबईतील ग्रामविकास विभागापुढे महाराष्ट्र  राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार प्रणित) यांच्या नेतृत्वात आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.  

७ व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी देताना प्रामुख्याने लिपीक वर्गीय संवर्गासह व इतर संवर्गाच्या कर्मचाऱ्यांवर बक्षी समितीने अन्याय केला आहे. त्यानंतर याच समितीच्या खंड २ चा अहवाल बाहेर आल्यावर त्यातही निराशाच हाती आली आहे. राज्य शासनाच्या काही विभागातील लिपीकांच्या वेतनश्रेणीत सुधारणा केल्या. त्यात ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णय ७ नोव्हेंबर २०२३ नुसार व राज्य शासनाच्या एका विभागातील लिपीकांच्याच वेतन श्रेणीत गत आठवड्यात सुधारीत शासन निर्णय पारित करण्यात आला.

तसेच शासनाने मंत्रालयातील लिपीक, टंकलेखन या संवर्गाच्या वेतनश्रेणीत एकमुश्त ५ हजारांची दरमहा वेतनवाढ केली. परंतु गेल्या १५-२० वर्षांत अनेकदा आंदोलन व शासनाकडे निवेदन सादर करुनही जि.प. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाही. यामुळेच पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे राज्याध्यक्ष बलराज मगर यांच्या नेतृत्वात हे आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावर ध्वजारोहनानंतर पालकमंत्र्यांकडे या आंदोलनाबाबत निवेदन देऊन शासनस्तरावर निर्णय घेण्यासाठी व शिफारशीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य सहचिटणीस अरविंद अंतुरकर यांनी दिली.  आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार संघटनेचे कार्याध्यक्ष किशोर भिवगडे, कोषाध्यक्ष राहुल देशमुख, सुजीत अढाऊ, विजय भुरेवार, सुभाष पडोळे, अक्षय मंगरुळकर आदींनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर