शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

कमलताई व आगलावे यांची दीक्षाभूमी स्मारक समितीवर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 21:43 IST

Nagpur News दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची ३ सप्टेंबरला बैठक झाली होती. या बैठकीत भन्ते नागदीपंकर, डॉ. कमलताई गवई, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम या चार जणांच्या नावावर चर्चा झाली. सूत्रानुसार समितीमध्ये सदस्यांच्या नावावरून अजूनही एकमत नसल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देभन्ते नागदीपंकर व डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची ३ सप्टेंबरला बैठक झाली होती. या बैठकीत भन्ते नागदीपंकर, डॉ. कमलताई गवई, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम या चार जणांच्या नावावर चर्चा झाली. मात्र, डॉ. कमलताई वगळता इतर नावावर एकमत न झाल्याने त्या दिवशी झालेली बैठक वादळी ठरली होती. मात्र, पाच दिवसांनंतर याच चार जणांची नियुक्ती स्मारक समितीने केली असल्याची चर्चा आहे. स्मारक समितीच्या सदस्यांनी मात्र यावर काहीही बोलण्यास नकार दिला. सूत्रानुसार समितीमध्ये सदस्यांच्या नावावरून अजूनही एकमत नसल्याचे सांगितले जाते.  (Selection of Kamaltai and Aglave on Deekshabhoomi Memorial Committee)

 

स्मारक समितीच्या मागील साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सहा तास मॅरेथॉन बैठक सुरू होती. सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नसले तरी, ही नावे ठरवली आहेत. याच नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समितीतील एका गटाचे म्हणणे आहे. या नावांवरून समितीमध्ये थेट दोन गट पडल्याची जोरदार चर्चा आहे. दादासाहेब गवई यांच्या निधनानंतर प्रथमच भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांची निवड झाली. यानंतर मात्र स्मारक समितीच्या बैठकीच होत नसल्याचे दिसून आले.

सध्या दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमधील अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, कार्यवाह सुधीर फुलझेले, डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे, एन.आर. सुटे ही प्रमुख नावे असून, यांच्यात एकवाक्यता नसल्याचे शुक्रवारी झालेल्या बैठकीतून दिसून आल्याची चर्चा रंगली होती. दुपारी २ वाजता बैठकीला सुरुवात झाली होती. रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी संपली. गवई आणि फुलझेले यांनी बैठकीतून बाहेर जाऊन चर्चा केली होती.

भन्ते नागदीपंकर, डॉ. कमलताई गवई, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम या चार जणांच्या निवडीसंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी समितीचे कार्यवाह डॉ. सुधीर फुलझेले यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही. नावावर एकमत झाले नसल्यानेच घोषणा झाली नाही, अशीही चर्चा आहे.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी