शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानज्योतीसाठी जिल्ह्यातून चार शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST

ठाकरे : लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) अंतर्गत राज्यातील १०० आदर्श शाळांच्या निवडीसाठी ...

ठाकरे :

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) अंतर्गत राज्यातील १०० आदर्श शाळांच्या निवडीसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत असून, त्यामध्ये जिल्ह्यातील चार शाळांची निवड करण्यात आली आहे. त्या शाळांचे राज्यस्तरासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिले.

जिल्ह्यात व्हीएसटीएफ- मिशन १०० आदर्श शाळा हे अभियान राबविण्यात आले असून, त्या अभियानाचा आढावा शुक्रवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी चार शाळांची निवड केली. यात पारशिवनी तालुक्यातील ढवळापूर येथील आदिवासी शाळा, भिवापूर तालुक्यातील मानोरा आणि रामटेक तालुक्यातील सावरा या बिगर आदिवासी तसेच कुही तालुक्यातील वग येथील शाळेचा समावेश आहे.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेंद्र भुयार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी, गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर, श्रीमती माणिक हिमाणे, पी.के. बमनोटे, सहायक गटविकास अधिकारी चंद्रकांत देशमुख, विस्तार अधिकारी रमेश चरडे, अभियानाच्या जिल्हा कार्यकारी किरण भोयर, तालुका समन्वयक रुपेश जवादे, कैलास लोखंडे, अविनाश मानकर, अंकित देशमुख उपस्थित होते.

पारशिवनी आणि रामटेक तसेच कुही आणि भिवापूर तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी दुसऱ्या तालुक्यातील निवड झालेल्या शाळांना भेटी देऊन निकष पूर्ण केल्याची तपासणी करावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी ठाकरे यांनी बैठकीत दिले.

या शाळांमध्ये भौतिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, पर्यावरणस्नेही शाळा व आरोग्य आणि पोषण तसेच आनंददायी शिक्षण या निकषांचा समावेश आहे. ‍राज्यस्तर ते शाळास्तरापर्यंतचे प्रत्यक्ष नियोजन, अंमलबजावणी व मूल्यमापन विविध उपक्रम राबविण्यासाठी २६ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान या अभियानात समाविष्ट उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शाळांची पाहणी व मूल्यांकन, गावसभेचे आयोजन, आदर्श शाळा विकास आराखडा, आराखड्यास अंतिम मंजुरी देणे, १० मेंटार्सची निवड करणे आदी होत. हे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना ३ जानेवारी २०२२ रोजी सावित्रीबाई फुले जयंतीला आदर्श शाळा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.