सावनेर : केळवद (ता. सावनेर) पाेेलिसांनी रामपुरी फाटा परिसरात बुधवारी (दि. २३) सायंकाळी केलेल्या कारवाईमध्ये दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दाेघांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण ५८,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चंद्रशेखर संपत राऊत (२५) व हर्षवर्धन विनायक धाेटे (२४) दाेघेही रा. पिपळा (नारायणवार), ता. साैंसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. दारूची वाहतूक केली जात असल्याचे कळताच पाेलिसांनी रामपुरी फाटा परिसरातील वाहनांवर नजर ठेवली हाेती. यात त्यांनी एमएच-४०/बीएन-६८५३ क्रमांकाच्या माेटरसायकलने जाणाऱ्या दाेघांना थांबवून त्यांची झडती घेतली. त्यात त्यांच्याकडे देशी व विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच दाेघांना अटक केली. त्यांच्याकडून ५० हजार रुपयांची माेटरसायकल व ८,७०० रुपयांची दारू असा एकूण ५८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला.