शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महा डीबीटी पाेर्टलवर बियाणे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:09 IST

रामटेक : राज्य शासनाच्या महा डीबीटी या पाेर्टलवर विविध शेतीविषयक याेजनांसाेबतच शेतकऱ्यांना बियाणेदेखील उपलब्ध हाेणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी या ...

रामटेक : राज्य शासनाच्या महा डीबीटी या पाेर्टलवर विविध शेतीविषयक याेजनांसाेबतच शेतकऱ्यांना बियाणेदेखील उपलब्ध हाेणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी या पाेर्टलवर जाऊन १५ मेपर्यंत अर्ज सादर करणे अनिवार्य आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी दिली.

राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध शेतीविषयक याेजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्यापासून तर लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली या पाेर्टलद्वारे विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. यावर शेतकऱ्यांना शेतीशी निगडित विविध बाबी व याेजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाकडे अर्ज करता येतो.

या पाेर्टलवर ‘शेतकरी याेजना’ शीर्षकांतर्गत बियाणे मिळवण्यासाठी अर्ज करता येताे. यासाठी १५ मे ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीन, तूर, धान, मूग, उडीद, मका व बाजरीचे बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध हाेणार आहे. या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा हाेणार आहे. यासाठी आधारकार्ड प्रमाणित करणे आवश्यक आहे.

सामूहिक सेवा केंद्रातून हा अर्ज भरला जाऊ शकताे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी दिली असून, याबाबत अडचणी असल्यास कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.