शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

२३ जुलैला पहा ‘निओवाईस’ धूमकेतू ; पृथ्वीजवळ आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:55 IST

२३ जुलै रोजी म्हणजे गुरुवारी हा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे.

ठळक मुद्दे साडेचार हजार वर्षांनंतर आला योगसाध्या डोळ्यांनी पाहता येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आकाराने पाच किलोमीटरपर्यंत विस्तारलेला असलेला ‘निओवाईस’ हा धूमकेतू सध्या पृथ्वीभोवतीच्या अवकाशात दिसू लागला आहे. खगोलीय घडामोडींची आवड असलेले, खगोलशास्त्राचे अभ्यासक आणि सामान्य नागरिकांमध्येही या धूमकेतूची चर्चा सुरू आहे. २३ जुलै रोजी म्हणजे गुरुवारी हा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. पृथ्वीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही, कारण हे जवळचे अंतर तब्बल १० कोटी ३० लाख किलोमीटरचे आहे. मात्र या अंतरावरूनही साध्या डोळ्याने दिसेल, इतके तेजस्वी त्याचे रूप आहे.

नुकतेच २७ मार्च रोजी सूर्याजवळून जात असताना निओवाईस या धूमकेतूचा शोध लागला. नासाच्या दुर्बिणीतून वायव्यकडच्या आकाशाकडे या धूमकेतूचे दर्शन घडले. सी/२०२० एफ३ ही निओवाईसची खगोलीय ओळख आहे. रमण विज्ञान केंद्राचे खगोलशास्त्राचे शिक्षक महेंद्र वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार हा धूमकेतू आपल्याच ग्रहमालेतील असून सूर्याभोवती परिक्रमा करतो. त्याला एक परिक्रमा पूर्ण करायला तब्बल ६८०० वर्ष एवढा प्रदीर्घ कालावधी लागतो आणि ही प्रदक्षिणा पूर्ण करून तो पृथ्वीजवळ आला आहे. म्हणजे पुढची प्रदक्षिणा केल्यानंतर ६००० पेक्षा अधिक वर्षांनी म्हणजे इ.स. ८००० नंतरच त्याचे पुन्हा दर्शन होईल.

विशेष म्हणजे १४ जुलैपासून ते ४ ऑगस्टपर्यंत म्हणजे २० दिवस साध्या डोळ्यांनी पाहण्याची अनोखी संधी महाराष्ट्रासह समस्त पृथ्वीवासीयांना लाभणार आहे. सूर्यास्तानंतर वायव्य दिशेला म्हणजेच उत्तर-पश्चिमेच्या आकाशात हा धूमकेतू पाहता येईल. सध्या देशात मान्सूनचे आगमन झाल्याने नीरभ्र आकाश सापडणे दुर्मिळ आहे. मात्र २० दिवसांच्या काळात ही संधी उपलब्ध झाली तर हा दुर्मिळ धूमकेतू पाहणे सोडू नका, असे आवाहन वाघ यांनी केले.

४ ऑगस्टपर्यंत संधीपूर्वीच्या हेलबॉप याप्रमाणेच तेजस्वी असलेल्या निओवाईसचे अमेरिका व कॅनडा या देशातील नागरिकांनी दर्शन घेतले आहे. भारतातही सगळीकडून त्याचे दर्शन होईल, पण सध्या पावसाळा असल्याने ढगांमुळे तो दिसणे कठीण आहे. मात्र ४ ऑगस्टपर्यंत आकाश स्वच्छ झाल्यास तो सूर्यास्तानंतर नक्की दिसेल, अशी माहिती महेंद्र वाघ यांनी दिली.

धूमकेतूची विशेषताधूमकेतू हे आपल्या सूर्यमालेचेच घटक असतात. १९९७ साली आलेला हेल-बॉप हा धूमकेतू सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता आणि तो पृथ्वीवर आदळेल, अशी प्रचंड भीती त्यावेळी निर्माण झाली होती. त्यानंतर २००७ मध्ये मॅकनॉट नावाचा धूमकेतू पृथ्वीवरून दिसला होता. त्यानंतर साध्या डोळ्यांनी दिसणारा निओवाईस हा तिसरा धूमकेतू होय. सध्या तो १० कोटी ३० लाख किमी अंतर दूर आहे. यांचा आकार ओबडधोबड असतो आणि त्यात धूळ, बर्फ, वायू यांचा समावेश असतो. निओवाईसचा आकार पाच किमीपर्यंत पसरलेला आहे. सूर्याजवळून प्रवास करताना प्रखरतेमुळे त्यांच्यातील बर्फ वितळतो. यामुळे पृथ्वीवरून पाहताना त्यांचे शेपूट दिसते. तसा हा दोन शेपट्यांचा धूमकेतू आहे. एक शेपूट धुलिकणांची असते तर दुसरी वायूंची असते. याच वर्षी स्वॅन आणि अ‍ॅटलास हे दोन धूमकेतूसुद्धा पृथ्वीजवळून गेले होते.

टॅग्स :scienceविज्ञान