शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भूगर्भातील खनिजांची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: August 6, 2016 02:45 IST

केंद्र शासनाच्या ‘खाण व खनिजे (विकास व नियमन) सुधारित कायदा-२०१५’मुळे भूगर्भातील खनिजांची व

नागपूर : केंद्र शासनाच्या ‘खाण व खनिजे (विकास व नियमन) सुधारित कायदा-२०१५’मुळे भूगर्भातील खनिजांची व खनिज उद्योगांची सुरक्षा धोक्यात आल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका जनहित याचिकेत करण्यात आला आहे. दीपक फुके असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. सुधारित कायद्यातील कलम ८, १० बी व ११ आणि खनिजे नियम (२०१५)ला अवैध घोषित करण्यात यावे अशी विनंती त्यांनी याचिकेत केली आहे. केंद्र शासनाने २७ मार्च २०१५ रोजी ‘खाण व खनिजे (विकास व नियमन) कायदा-१९५७’मध्ये दुरुस्ती केली आहे. देशात आता ‘खाण व खनिजे (विकास व नियमन) सुधारित कायदा-२०१५’ लागू आहे. राज्य शासनाने १९ नोव्हेंबर २०१५ रोजी नोटीस जारी करून नांदगाव-एकोडी, डेगवे-बंडा, चितळे-वाटंगी व खोबना येथील चुनखडी, लोह खनिज, बॉक्साईट व टंगस्टनच्या खाणी भाडेपट्टीवर देण्यासाठी निविदा आमंत्रित केल्या होत्या. परंतु, केवळ तीन निविदा आल्यामुळे नोटीस रद्द करण्यात आली. यानंतर राज्य शासनाने १३ जून २०१६ रोजी सुधारित कायद्यान्वये टेंडर नोटीस जारी केली आहे. खनिजे व खनिजांवर अवलंबून असलेल्या उद्योगांच्या सुरक्षेसाठी यात काहीच तरतूद नाही. खनिज लिलाव नियमानुसार, एकात्मिक स्टील प्रकल्पांना लोह खनिजाच्या खाणी भाडेपट्टीवर द्यायच्या असल्यास संबंधित खाणीमध्ये किती लोह खनिज आहे व त्या खनिजाची गुणवत्ता काय आहे याची माहिती सादर करणे आवश्यक आहे. १३ जून २०१६ रोजीच्या टेंडर नोटीसमध्ये अशाप्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. परिणामी ही टेंडर नोटीस रद्द करण्याची गरज आहे. राज्यघटनेतील आर्टिकल ३९ अनुसार खनिजे व नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करणे राज्य शासनाची जबाबदारी आहे. सुधारित कायदा, लिलाव नियम व वादग्रस्त टेंडर यामुळे सदर आर्टिकलचे उल्लंघन झालेय असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी) हायकोर्टाची शासनाला नोटीस उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी गुरुवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर केंद्रीय खाण विभागाचे सचिव, राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सचिव आणि भूविज्ञान व खाण संचालनालय यांना नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली.