शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी

By admin | Updated: July 24, 2015 02:45 IST

दहशतवादी कृत्य करून मुंबईत मोठा विध्वंस घडवून आणणाऱ्या आणि ३० जुलै रोजी फासावर चढवल्या जाणाऱ्या ...

नागपूर : दहशतवादी कृत्य करून मुंबईत मोठा विध्वंस घडवून आणणाऱ्या आणि ३० जुलै रोजी फासावर चढवल्या जाणाऱ्या याकूब मेमनची शुबेल फारुख यांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहात घेतलेली भेट ही सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समजली जात आहे. फारुख हे मंगळवारच्या सकाळी अचानक नागपुरात अवतरले. त्यांच्यासोबत एक स्थानिक वकील होता. फारुख यांनी दिल्ली बार कौन्सिलचा सदस्य असल्याचे कारागृह प्रशासनाला सांगितले. बार कौन्सिलचा सदस्य असल्याचे ओळखपत्र सादर केले. केवळ या ओळखपत्राच्या आधारावर त्यांनी विशेष मुलाखत कक्षात याकूब मेमनची दीर्घ भेट घेतली. वास्तविक या ओळखपत्राची मुदत ३१ जानेवारी २०१३ रोजीच संपलेली होती. आपल्या दहशतवादी कृत्याने एक आठवड्यानंतर फासावर जाणाऱ्या याकूबची मुलाखत देण्यापूर्वीच वकील असल्याचे सांगणाऱ्या फारुखच्या ओळखपत्राची पडताळणी करणे आवश्यक होते. ओळखपत्र कालबाह्य असल्याचे समजताच प्रशासनाने फारुखकडून ओळखीचे अन्य पुरावे घेणे आवश्यक होते. तसे न करता थेट मुलाखत देणे म्हणजे सुरक्षा व्यवस्थेतील ही गंभीर त्रुटी होय, अशी प्रतिक्रिया जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. वकिलाच्या गणवेशात उत्तर प्रदेश आणि मुंबई न्यायालयात घातपातासारख्या घटना घडलेल्या आहेत. ३१ मार्च रोजी पाच खतरनाक गुन्हेगारांनी केलेल्या जेल ब्रेकनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहात मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि अंमलीपदार्थ आढळून आले होते. घातक शस्त्रेही सापडली होती. तथापि, शस्त्रे सापडण्याच्या बाबीवर पडदा टाकण्यात आला होता. बहुतांश आक्षेपार्ह वस्तू मुलाखत कक्षामार्फतच कारागृहात पोहोचल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. याकूब हा दहशतवादी असल्याने फारुखने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान आणखी काही कट तर शिजला नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)