शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

देशाची सुरक्षा सैन्यावरच अवलंबून : अशोक मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:56 IST

ढोंगी मानवतावादी, तथाकथित बुद्धिवादी व पुरोगामी लोकांच्या सानिध्यात भारत सुरक्षित राहू शकत नाही. देशाची सुरक्षितता खऱ्या अर्थाने सैन्यावरच अवलंबून आहे, असे परखड मत विंग कमांडर अशोक मोठे यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देशहीद सैनिकाप्रती पद्मगंधाची कृतज्ञता : शहीद पत्नीला सोपविली मदतराशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ढोंगी मानवतावादी, तथाकथित बुद्धिवादी व पुरोगामी लोकांच्या सानिध्यात भारत सुरक्षित राहू शकत नाही. देशाची सुरक्षितता खऱ्या अर्थाने सैन्यावरच अवलंबून आहे, असे परखड मत विंग कमांडर अशोक मोठे यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.देशातील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पद्मगंधा प्रतिष्ठान व रसिकराज कला संस्थेतर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या विदर्भातील संजय विक्रमसिंह राजपूत यांच्याप्रती संवेदना व्यक्त करीत त्यांच्या पत्नी सुषमा राजपूत यांना लोकसहभागातून गोळा झालेला ५१ हजार रुपयांचा निधी कृतज्ञतापूर्वक समर्पित करण्यात आला. याप्रसंगी सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन दीपक लिमसे, पद्मगंधाच्या अध्यक्षा शुभांगी भडभडे, उपाध्यक्षा विजया ब्राह्मणकर, रसिकराजचे अध्यक्ष डॉ. बळवंत भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. अंजली परनंदीवार यांनी गायलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो...’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.अशोक मोठे म्हणाले, संजय राजपूत हे ११ फेब्रुवारीला नागपूरला येऊन गेले होते. नुकताच त्यांनी आपला कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवून घेतला होता व ११५ बटालियनमध्ये कार्यरत होते. आजपर्यंत परराष्ट्र धोरण मावळ स्वरूपाचे होते. सर्जिकल स्ट्राईक ही धर्मयुद्धाच्या जवळची कल्पना असल्याचे ते म्हणाले. यावेळी कॅप्टन दीपक लिमसे यांनी पुलवामा हल्ल्यानंतर १४ दिवसात प्रतिहल्ला करणाऱ्या सैनिकांच्या कारवाईचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देणाऱ्या सुषमा राजपूत ‘धन्यवाद’ या शब्दाशिवाय काहीच बोलू शकल्या नाही. बाकीच्या भावना अश्रु रूपात बाहेर आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजया ब्राह्मणकर यांनी केले. संचालन स्वाती मोहरीर यांनी केले. परिणिता कवळेकर यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाnagpurनागपूर