लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झिंगाबाई टाकळीच्या वस्तीत नुकताच एक रुग्ण आढळल्याने या वस्तीला कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने महापालिकेने बॅरिकेडस् लावून प्रतिबंध लावला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी पोलीस उपस्थित नसल्याने बॅरिकेडस् निघाले आणि लोकांची रहदारी बिनदिक्कतपणे सुरू झाली.१२ जून रोजी या वस्तीत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने पूर्ण वस्ती सील करण्याची घोषणा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली. बॅरिकेडस् लावून या वस्तीतील रहदारीला प्रतिबंधित करण्यात आले. मात्र या चौकीजवळ पोलिसांची गस्त लावण्यात आली नाही. त्यामुळे बॅरिकेडस् निघाले आणि लोकांची रहदारी बिनधास्तपणे सुरू झाली. एका स्थानिक नागरिकाने ‘लोकमत’कडे या परिस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ पाठवून परिस्थितीबाबत अवगत केले. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा फैलाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून परिसर सील करण्यात येतो. त्यानुसार झिंगाबाई टाकळी भागातील ही वस्ती सील करण्यात आली खरी. पण तशी व्यवस्था न केल्याने नागरिकांची रहदारी सुरू असल्याने इतरांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याची भीती वस्तीतीलच नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागपुरातील त्या कन्टेन्मेंट झोनची सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 20:22 IST
झिंगाबाई टाकळीच्या वस्तीत नुकताच एक रुग्ण आढळल्याने या वस्तीला कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने महापालिकेने बॅरिकेडस् लावून प्रतिबंध लावला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी पोलीस उपस्थित नसल्याने बॅरिकेडस् निघाले आणि लोकांची रहदारी बिनदिक्कतपणे सुरू झाली.
नागपुरातील त्या कन्टेन्मेंट झोनची सुरक्षा वाऱ्यावर
ठळक मुद्देनागरिकांची बिनधास्त ये-जा : बॅरिकेडस्जवळ नाही पोलिसांची उपस्थिती