शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शाळा बंद करण्यास परवानगीची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:22 IST

माध्यमिक शाळा संहितेतील क्लॉज ७.५ अनुसार शिक्षण संस्था त्यांची माध्यमिक शाळा स्वत:हून बंद करू शकते. त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. तसेच, राज्य सरकार संस्थेला शाळा सुरू ठेवण्यास सांगू शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : सरकार शाळा सुरू ठेवण्यास सांगू शकत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माध्यमिक शाळा संहितेतील क्लॉज ७.५ अनुसार शिक्षण संस्था त्यांची माध्यमिक शाळा स्वत:हून बंद करू शकते. त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. तसेच, राज्य सरकार संस्थेला शाळा सुरू ठेवण्यास सांगू शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.बंद होणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत स्थानांतरित करण्यासाठी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा याकरिता संस्थेने केवळ राज्य सरकारला एक वर्ष आधी नोटीस तामील करणे आवश्यक आहे. परंतु शाळा बंद करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मागणे गरजेचे नाही. तसेच, राज्य सरकार संस्थेला शाळा सुरू ठेवण्यास बाध्य करू शकत नाही, असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी हा निर्णय दिला आहे.आर्थिक तंगी व अन्य विविध कारणांमुळे सिख शिक्षण संस्थेने त्यांची बेझनबाग येथील गुरुनानक माध्यमिक शाळा २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून बंद करण्यासाठी सरकारला परवानगी मागितली होती. २२ मे २०१७ रोजी शिक्षणमंत्र्यांनी शाळा बंद करण्यास परवानगी नाकारली होती. त्यामुळे संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने हा निर्णय देऊन शिक्षणमंत्र्यांना असा आदेश जारी करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, शिक्षणमंत्र्यांचा वादग्रस्त आदेश अवैध ठरवून रद्द केला. संस्थेतर्फे अ‍ॅड. पी. ए. अभ्यंकर तर, सरकारतर्फे अ‍ॅड. भगवान लोणारे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSchoolशाळा