शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपुरात ६२ व्यावसायिकांचे बँक खाते सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 22:53 IST

आर्थिक वर्षाचा मार्च हा शेवटचा महिना आहे. ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर व एलबीटीची रक्कम वसुली व्हावी यासाठी महापालिकेचा कर व कर आकारणी विभाग तसेच स्थानिक संस्था कर (एलबीटी)विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. ५९८ व्यावसायिकांनी गेल्या काही वर्षातील एलबीटीची ५७१ कोटींची रक्कम अद्याप जमा केलेली नाही. यातील ६२ व्यावसायिकांचे बँक खाते सील करण्यात आले आहे तर ५३६ व्यावसायिकांची मालमत्ता लिलावात काढली जाणार आहे.

ठळक मुद्दे५३६ जणांच्या मालमत्ता लिलावात काढणार : ५७१ कोटीचा एलबीटी जमा न केल्याने कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक वर्षाचा मार्च हा शेवटचा महिना आहे. ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर व एलबीटीची रक्कम वसुली व्हावी यासाठी महापालिकेचा कर व कर आकारणी विभाग तसेच स्थानिक संस्था कर (एलबीटी)विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. ५९८ व्यावसायिकांनी गेल्या काही वर्षातील एलबीटीची ५७१ कोटींची रक्कम अद्याप जमा केलेली नाही. यातील ६२ व्यावसायिकांचे बँक खाते सील करण्यात आले आहे तर ५३६ व्यावसायिकांची मालमत्ता लिलावात काढली जाणार आहे.एलबीटी लागू असताना व्यावसायिकांनी नोंदणी केली होती. मात्र अनेकांनी एलबीटी भरलेली नाही. तसेच काही व्यावसायिकांनी उत्पन्न कमी दर्शवून एलबीटी कमी जमा केली आहे. अशी २०१३ पासूनची थकबाकी व त्यावरील व्याज व दंड गृहीत धरून ही रक्कम ५७१ कोटीपर्यत जाते. अशा व्यावसायिकांचा शोध घेऊन आयकर विभागाकडून त्यांच्या व्यवसायाची माहिती घेण्यात आली. एलबीटी विभागाकडे सादर केलेली माहिती व आयकर विभागाला सादर केलेला डाटा यात मोठी तफावत आहे . वारंवार नोटीस बजावल्यानंतरही एलबीटी जमा न करणाऱ्या ६२ व्यावसायिकांची बँक खाती सील करण्याबाबत एलबीटी विभागाने संबंधित बँकांना कळविल्याची माहिती एलबीटी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.५३६ व्यावसायिकांची आरआरपी काढण्यात आली आहे. या संदर्भात डिमांड पाठविण्यात आली होती. त्यानंतरही व्यावसायिकांनी एलबीटी जमा केलेला नाही. अशा व्यावसायिकांच्या मालमत्ता लिलावात काढण्याचे निर्देश झोनच्या सहायक आयुक्तांना दिले आहे.५५६ लोकांच्या मालमत्ताचाही लिलावमार्च संपायला १५ दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. परंतु महापालिकेच्या मालमत्ता कराची अपेक्षित वसुली झालेली नाही. झोन अधिकारी व कर निरीक्षकांनी २५ हजारांहून अधिक थकबाकी असलेल्या ७९०६ मालमत्ताधारकांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यांच्याकडील १४९ कोटींची थकबाकी वसूल करण्याचे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले आहे. त्यानुसार यातील ५५६ मालमत्ताधारकांना हुकूमनामा बजावण्यात आला आहे. यानंतरही १५ दिवसात थकबाकी न भरल्यास या सर्वांच्या मालमत्ता लिलावात काढल्या जाणार आहे.छोट्या वसुलीवरही भरतसेच पाच हजारापर्यंत थकबाकी असलेल्यांची संख्या दीड लाखाच्या आसपास आहे. अशा मालमत्ताधारकांकडे एकूण ७० ते ८० कोटींची थकबाकी आहे. अशा केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. यात मिहान, मेयो आणि मेडिकल रुग्णालय, क्रीडा संकुल आणि मुलांचे वसतिगृह यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकीत आहे. सर्वच प्रकारच्या थकबाकीची वसुली करण्यावर भर दिला जात आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर