शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एसडीआरएफ जवानांचा नागपूर-मुंबई सायकल प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 21:28 IST

राज्य राखीव पोलीस दल (एसडीआरएफ) चा ७१ वा वर्धापन दिन येत्या ६ मार्चला साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत एसडीआरएफच्या जवानांतर्फे नागपूर ते मुंबई सायकल रॅली काढण्यात आली आहे. लेक वाचवा लेक शिकवा तसेच पर्यावरण वाचविण्याचा संदेश आणि एसडीआरएफ जवानांच्या कार्याविषयी जनजागृती करीत १२ दिवसाचा प्रवास करून ही रॅली ६ मार्चला मुंबईला पोहचणार आहे.

ठळक मुद्देलेक वाचवा व पर्यावरणाचा संदेश : ६ मार्चला वर्धापन दिन

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य राखीव पोलीस दल (एसडीआरएफ) चा ७१ वा वर्धापन दिन येत्या ६ मार्चला साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत एसडीआरएफच्या जवानांतर्फे नागपूर ते मुंबई सायकल रॅली काढण्यात आली आहे. लेक वाचवा लेक शिकवा तसेच पर्यावरण वाचविण्याचा संदेश आणि एसडीआरएफ जवानांच्या कार्याविषयी जनजागृती करीत १२ दिवसाचा प्रवास करून ही रॅली ६ मार्चला मुंबईला पोहचणार आहे.नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखवत सायकल रॅलीमध्ये सहभागी एसडीआरएफच्या ८० जवानांना रवाना केले. राज्य राखीव दलाचे कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशांतर्गत कायदा व सुव्यस्थेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. सामाजिक कार्यातही एसडीआरएफ आघाडीवर असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. रॅलीला रवाना करण्यापूर्वी कवायत मैदानावर पार पडलेल्या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, समादेशक प्रणय अशोक, जावेद अनवर, पोलीस उपायुक्त संजय शिंत्रे, एचडीएफसी बँकेचे क्षेत्रीय प्रमुख विवेक हांडा आदी उपस्थित होते. सायकल रॅलीमध्ये सहभागी एसडीआरएफचे कर्मचारी दररोज किमान ३६ ते ९० किलोमीटरचा प्रवास आणि १२ ठिकाणी मुक्काम करीत ९३८ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत. ६ मार्चला मुंबई येथे आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हे जवान सहभागी होणार आहेत. या प्रवासात लेक वाचवा व पर्यावरण वाचविण्याच्या संदेशासह प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांची माहिती, शस्त्र प्रदर्शन आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची प्रात्याक्षिके दाखविणार आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCyclingसायकलिंग